नव्या मंत्रिमंडळात एकावर खुनाचा, चौघांवर खुनाच्या प्रयत्नाचे तर सात जणांवर दंगलीचे गुन्हे - in new union cabinet 33 ministers have criminal background | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

नव्या मंत्रिमंडळात एकावर खुनाचा, चौघांवर खुनाच्या प्रयत्नाचे तर सात जणांवर दंगलीचे गुन्हे

वृत्तसंस्था
सोमवार, 12 जुलै 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा मेगाविस्तार नुकताच झाला. नव्या मंत्रिमंडळातील  42 टक्के मंत्री हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet) मेगाविस्तार नुकताच झाला. यातील 33 मंत्री गुन्हेगारी पार्श्वभूमीचे (Criminal Background) आहेत. एकावर खुनाचा तर चौघांवर खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल आहेत. अमित शहा आणि गिरीराजसिंह यांच्यावर दंगलीचे गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या (ADR) अहवालातून समोर आली आहे.

एडीआर ही निवडणूक हक्क संस्था आहे. निवडणूक लढवताना उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांच्या आधारे ही संस्था अहवाल प्रसिद्ध करते. यात उमेदवारांची संपत्ती, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि इतर गोष्टींचा समावेश असतो. मोदींच्या मंत्रिमंडळातील नव्या 15 कॅबिनेट आणि 28 राज्यमंत्र्यांचा शपथविधी 7 जुलैला झाला. यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या 78 वर पोचली आहे. नव्या मंत्रिमंडळातील 33 मंत्र्यांवर (42 टक्के) गुन्हे दाखल आहेत.   

हेही वाचा : मोदींच्या मंत्रिमंडळातील या आहेत सर्वांत गरीब मंत्री..अजूनही करतात शेती 

मंत्रिमंडळातील 33 मंत्र्यांवर आधी गुन्हे दाखल झाले असले तरी त्यातील 24 जणांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. यात खून, खुनाचा प्रयत्न आणि जबरी चोरी या गुन्ह्यांचा समावेश आहे. पश्चिम बंगालमधील निसिथ प्रामाणिक हे खुनाचा गुन्हा दाखल असलेले एकमेव मंत्री आहेत. खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असलेले चार मंत्री आहेत. यात पश्चिम बंगालमधील जॉन बारला, निसिथ प्रामाणिक, उत्तर प्रदेशातील पंकज चौधरी आणि महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेलेले व्ही. मुरलीधरन यांच्या समावेश आहे. 

हेही वाचा : मंत्रिमंडळात सर्वाधिक कर्ज नारायण राणेंच्या डोक्यावर 

मंत्रिमंडळातील 5 मंत्र्यांविरुद्ध धार्मिक दंगलीचे गुन्हे दाखल आहेत. यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा समावेश असून, त्यांच्यावर असे 4 गुन्हे दाखल आहेत. गिरीराजसिंह यांच्यावर दंगलीचे 6 गुन्हे दाखल आहेत. शोभा करंदालजे यांच्यावर 3, नित्यानंद राय यांच्यावर 3 आणि प्रल्हाद जोशी यांच्यावर 1 गुन्हा दाखल आहे. निवडणूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी 7 मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत. यात मतदारांना पैसे वाटणे, लाच देणे आणि निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव आणणे आदी बाबींची समावेश आहे. यात नितीन गडकरी, सत्यपाललिंह बघेल, गिरीराजसिंह, पंकज चौधरी, अश्वनीकुमार चौबे, भागवत खुबा आणि कौशल किशोर यांचा समावेश आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख