मोठी बातमी : राज्यसभेत पुन्हा हरिवंश; वरिष्ठ सभागृहावर सरकारची पकड घट्ट

संसद अधिवेशन आजपासून सुरू झाले. राज्यसभा उपसभापतिपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवाराने विरोधी पक्षांच्या उमेदवाराला पराभूत केले आहे.
nda candidate harivansh elected as the deputy chairman of rajya sabha
nda candidate harivansh elected as the deputy chairman of rajya sabha

मुंबई : राज्यसभा उपसभापतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार व संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) नेते हरिवंशसिंह यांनी बाजी मारली आहे. त्यांनी विरोधी पक्षांचे उमेदवार व राष्ट्रीय जनता दलाचे (जेडीयू) नेते मनोज झा यांचा पराभव केला आहे. राज्यसभेतील सरकार आणि विरोधकांच्या नेमक्या ताकदीचा अंदाज या निवडणुकीने आला आहे. राज्यसभेवरील सरकारची पकड आता आणखी घट्ट झाल्याचे या निवडणुकीने समोर आले आहे. 

राज्यसभा उपसभापतिपदासाठी मनोज झा हे विरोधी पक्षांचे उमेदवार होते. त्यांच्यासमोर एनडीएचे उमेदवार हरिवंशसिंह यांचे आव्हान होते. उपसभापतिपदाचा हरिवंशसिंह यांचा कार्यकाळ एप्रिलमध्ये संपल्याने हे पद रिकामे झाले होते. आता यासाठी संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे आजच निवडणूक झाली. या निवडणुकीत अखेर हरिवंश यांनी बाजी मारली आहे. 

आज दुपारी 3 नंतर राज्यसभेचे कामकाज सुरू झाले. राज्यसभेतील विरोधी पक्षांच्या नेमक्या ताकदीचा अंदाज या निवडणुकीने येणार असल्याने ती महत्वाची बनली होती. राज्यसभेची एकूण सदस्यसंख्या 245 असली तर एक जागा रिक्त आहे. त्यामुळे बहुमताचा आकडा 123 आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचे 110 सदस्य आहेत. 

राज्यसभेच्या उपसभापतिपदासाठी 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीत हरिवंश यांनी काँग्रेसचे उमेदवार बी.के.हरिप्रसाद यांचा पराभव केला होता. त्यावेळी हरिवंश यांना 125 मते आणि हरिप्रसाद यांना 105 मते मिळाली होती. त्यावेळच्या तुलनेत भाजपची राज्यसभेतील स्थिती आणखी मजबूत झाल्याने हरिवंश यांचा विजय नक्की मानला जात होता. 

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मनोज झा यांना शिवसेनेचा पाठिंबा जाहीर केला होता. ते म्हणाले होते की, राज्यसभा उपसभापतिपदासाठी विरोधी पक्षांच्या उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा आहे. 

'आप'चे नेते व खासदार संजयसिंह यांनी विरोधी पक्षांचे उमेदवार मनोज झा यांना पाठिंबा जाहीर केला होता. त्यांनी म्हटले होते की, राज्यसभेच्या उपसभापतिपदाच्या निवडणुकीत आम आदमी पक्ष विरोधी पक्षांचे उमेदवार संजयसिंह यांना पाठिंबा देत आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com