Tanaji Sawant News : वाह रे आरोग्यमंत्री...हे तर महाराष्ट्राचे दुर्दैव... : सावंतांच्या गौप्यस्फोटावर राष्ट्रवादीचा हल्लाबोल

सर्वसामान्यांना उपचार मिळावेत, त्यांचे लसीकरण व्हावे आणि रोगाचे निर्मूलन व्हावे; म्हणून काम करत होते.
 Tanaji Sawant
Tanaji SawantSarkarnama

मुंबई : वाह रे आरोग्यमंत्री... जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाशी झुंजत होता आणि मविआ सरकार कोरोनावर मात करण्यासाठी लढत होते. तेव्हा तुम्ही त्या सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने बंडाची आणि सरकार पाडण्याची खलबतं करत होतात. त्या महाभयंकर संकटातही सत्ता जास्त प्रिय वाटली, त्यांच्याकडे आज राज्याच्या आरोग्याची जबाबदारी आहे, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसने आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया दिली आहे. (NCP's reaction to the secret blast by Tanaji Sawant)

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी २०१९ पासूनच तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत खलबतं, गुप्त बैठका सुरू होत्या, असे सांगितले. त्यावर राज्यातून उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही प्रतिक्रिया आली, त्यावेळी ती असा आरोग्य मंत्री लाभला हे महाराष्ट्राचे दुर्दैव असं म्हटलं आहे.

 Tanaji Sawant
Sambhaji Raje On Sawant : मग्रूर, निर्ढावलेल्या तानाजी सावंतांचा राजीनामा घ्या; अन्यथा.... : संभाजीराजेंचा सरकारला इशारा

जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाशी झुंजत होता आणि महाविकास आघाडीचे सरकार कोरोनावर मात करण्यासाठी लढत होते. सर्वसामान्यांना उपचार मिळावेत, त्यांचे लसीकरण व्हावे आणि रोगाचे निर्मूलन व्हावे; म्हणून काम करत होते. तेव्हा तुम्ही (तानाजी सावंत) तत्कालिन सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने बंड करण्याची, सरकार पाडण्याची आणि राज्यात अस्थिरता आणण्याची खलबतं करत होतात.

 Tanaji Sawant
Jalgaon News : एकनाथ खडसेंमुळे ‘राष्ट्रवादी’ बळकट; म्हणूनच भाजप नेते अस्वस्थ : जयंत पाटलांनी सुनावले

त्यासाठी देवेंद्र फडणवीसांसोबत बैठका घेत होतात. ज्यांना राज्य एका महाभयंकर रोगाचा सामना करत असतानाही सत्तालोलुपता जास्त प्रिय वाटते, त्यांच्याकडे आज राज्याच्या आरोग्याची जबाबदारी ईडी सरकारने टाकली आहे, यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेचे दुर्दैव ते अजून काय असावे? असा सवालही करण्यात आलेला आहे.

 Tanaji Sawant
Jayant Patil News : ही लढाई एकतर्फी नाही : निवडणुकीबाबत जयंत पाटलांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना इशारा

तानाजी सावंतांनी काय म्हटले होते?

नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका लढलो. जनतेने कलही आमच्या बाजूने दिला. मात्र, उध्दव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. ते सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व मी आमदारांचे कॉन्सलिंग करण्यासाठी दीडशे बैठका घेतल्या. तसेच, राज्यात मागील वर्षी झालेला सत्ताबदल हा फडणवीस, शिंदे व मी घडवून आणला आहे, असा गौप्यस्फोट तानाजी सावंत यांनी परांडा येथील एका कार्यक्रमात बोलताना केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com