गर्दीत हरवले आमदार रोहित पवार...कार्यकर्त्यांनी साखळी करुन काढलं बाहेर

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्यने जमलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये धकाबुक्की झाली.
ncp workers creatr ruckus in mla rohit pawar felicitation program in jalgaon
ncp workers creatr ruckus in mla rohit pawar felicitation program in jalgaon

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आज जळगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी कार्यालयात कार्यकर्त्यांनीत्यांच्या स्वागतासाठी मोठी धक्काबुक्की केल्यामुळे गोंधळ उडाला. शेवटी रोहित पवार यांना काही कार्यकर्त्यांनीच साखळी करुन गर्दीतून मोटारीपर्यंत पोचवले. 

आमदार रोहित पवार आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. जिल्ह्यातील भडगाव येथून त्यांच्या दौऱ्यास प्रारंभ झाला. विविध सामाजिक कार्यक्रम तसेच रुग्णालयाचे उदघाटन व पदाधिकाऱ्यांचया भेटी घेत ते पाचोरा, शेंदुर्णी, नेरी मार्गे जळगावला आले. दुपारी साडेतीन वाजता जळगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात त्यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, जिल्ह्यात इतर ठिकाणी  कार्यक्रम असल्यामुळे त्यांना जळगाव कार्यालयात येण्यास तब्बल तीन तास उशीर झाला. अखेर सायंकाळी सहा वाजता ते जळगाव येथील पक्ष कार्यालयातील कार्यक्रमास आले. 

पवार यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच प्रतिक्षा करीत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, गफ्फार मलिक, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

आमदार पवार कार्यक्रमस्थळी येताच कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी गर्दी केली. अनेक वेळा जाहीर करूनही कार्यकर्ते खाली बसण्यास तयार नव्हते. या गोंधळातच त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम पक्षातर्फे करण्यात आला. त्यानंतर पवार यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर ते जाण्यास निघाले त्यावेळीही कार्यकर्त्यांची गर्दी केली. या वेळीकार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील नेत्यांनाही धक्काबुक्की केली.  

कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी तसेच त्यांना हार देण्यासाठी गर्दी केली होती. प्रवेशव्दारातून बाहेर पडत असताना कार्यकर्त्यांच्या गर्दीत रोहित पवार अक्षरश: दबले गेले. 'मलाच अवघड झालंय’, असे शब्दही या गर्दीत त्यांच्या तोंडून बाहेर पडले. काही कार्यकर्त्यांनी साखळी करीत त्यांना अक्षरश: त्यांच्या वाहनाजवळ आणले आहे. अखेल वाहनात बसून ते दुसऱ्या कार्यक्रमास्थळी रवाना झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com