मोदींनी पवारांना आताच भेटीसाठी वेळ का दिली?

राष्ट्रवादी काँग्रेचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
Narendra Modi, Sharad Pawar
Narendra Modi, Sharad Pawarsarkarnama

मुंबई : भारतासारख्या महाकाय विशाल देशाचा राजशकट हाकताना पंतप्रधान आणि खरे तर सर्वच महत्वाच्या मंत्र्यांनी विरोधी पक्षातल्या ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांना भेटायला हवे. मात्र, सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असलेले विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सहसा अशा भेटीगाठींसाठी फारसे उत्सुक नसतात अशी चर्चा असते. आपण आणि आपले काम अशी त्यांची वृत्तीया स्वभावाला फाटा देवून ते आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना भेटले. लक्षव्दीप या अत्यंत महत्वाच्या टापुच्या लोकप्रतिनिधी खासदाराची तक्रार ऐका या पवारसाहेबांच्या शब्दाचा तो मान राखणे तर होतेच.

मात्र, मोदींना एकाच वेळी अनेक गोष्टी साध्य करायच्या होत्या का? भूरचनेत अनन्यसाधारण महत्व असलेल्या लक्षव्दीपात भारतीय उपखंडातली परिस्थिती लक्षात घेता काही वावगे घडू नये ही काळजी पंतप्रधान या नात्याने त्यांनी घेणे आवश्यक आहेच. शिवाय आणखी काही गणिते असतील? शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यातील मैत्रीभावना राजकारणात सर्वज्ञात असली, तरी आज जो वेळ मिळाला त्यामागे अधिक काही आहे?

Narendra Modi, Sharad Pawar
देशमुखांची दिल्लीवारी टळली; न्यायालयानं सीबीआयला बजावलं

हिंदुत्वाच्या नावाने एकत्र राहिलेली शिवसेना (Shivsena) फटकून वागली त्याला आता अडिच वर्षे होत आली. केंद्रीय तपास यंत्रणांनी या काळात महाराष्ट्रातील अनेक आर्थिक गुन्हे बाहेर काढले, राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यांनाही अटक केले गेले. कुटुंबातल्या राजकारणात नसलेल्या व्यक्तींवरही आयकर धाडी पडल्या. कटुता दोन्हीकडे वाढली असताना आज ही भेट झाली. यामागे राजकारणातले धक्कातंत्रही आहे अन कदाचित काही इशारे देणेही. शरद पवारांना वेळ देवून मोदींनी शिवसेनेला आश्चर्यचकित केले असेल का? महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होणे शक्य नाही याची जाणिव सर्वदूर पसरली असताना अचानक झालेल्या या भेटीने आपण एकमेकांचे मित्र आहोत, असा इशारा दोन्ही बडया नेत्यांना महाराष्ट्रातल्या अन्य राजकीय नेत्यांना द्यायचा असेल का?

सामनाचे संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांचे महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेतले योगदान पवारांच्या खालोखालचे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना भाजपच्या तंबुतून राष्ट्रवादीकडे आणणे शक्य झाले ते संजय राऊत यांच्यामुळे. त्यामुळेच राऊतांना ईडीने घेरले अन अनिल देशमुख, नवाब मलिकांच्या अटकेनंतर जे केले गेले नाही ते राऊतांबाबत पवारसाहेबांनी केले. राऊतांची पाठराखण केली. त्यांच्या मालमत्तांवर टाच आली असतानाच रदबदली झाली किंवा अशा धाडी योग्य नाहीत हे सांगितले गेले.

संजय राऊत यांच्या बाबात शिवसेनेतील ज्येष्ठांमध्ये जरा नाराजी आहे. पक्षधोरणांचा त्यांनी ट्रॅक बदलला असे कित्येकांना वाटते. अर्थात काल कारवाई होताच राऊतांच्या समर्थनासाठी सैनिक रस्त्यावर उतरले. त्यांचे आमदार भाऊ सुनिल लोकप्रिय आहेत. पक्षासाठी लाठीकाठी खाणाऱ्यांची फौज त्यांच्याकडे आहे. त्या ताकदीला पवार ओळखत असावेत, म्हणून ते त्यांच्यासाठी पंतप्रधानांकडे गेले. १२ आमदारांच्या सदस्यत्वाचा विषय पंतप्रधान हाती घेण्याची शक्यता कमी, कारवाया थांबवा हा निरोप ते ईडीसारख्या स्वायत्त यंत्रणांना विनंती झाल्याने स्वत: हून ते ही भाजप विरोधात सरकार बनवणार्यांना वाचवा यासाठी सक्रीय होतील, अशी शक्यता नाहीच तरीही वेळ का दिली गेली?

Narendra Modi, Sharad Pawar
भाजप व राष्ट्रवादीची युती होणार : आमदाराच्या भविष्यवाणीमुळे खळबळ

एकेकाळी राज्यकारभाराविषयी मार्गदर्शन करणाऱ्या गुरुंचा मान म्हणून? पवारांना चुचकारण्यासाठी की शिवसेना आणि महाराष्ट्राच्या राजकारणात आश्चर्यवर्तुळे निर्माण करण्यासाठी? माजी मंत्री अनिल देशमुख आता सीबीआय कस्टडीत गेले आहेत. आज सीबीआयप्रमुख असलेल्या जयस्वालांशी देशमुखांचे बरे नव्हते. गृहमंत्री पोलिसमहासंचालकातला हा वाद चर्चेचा विषय होता. आता जयस्वाल यांनी देशमुखांवर राग धरू नये अशी विनंतीही केली गेली का माहित नाही. का मोदींना त्यांच्या पंतप्रधानकीला आव्हान देवू बघणाऱ्या तिसऱ्या आघाडीच्या अघोषित नेत्यालाही आपण वेळ देतो हे दाखवायचे होते? प्रश्न अनेक आहेत. महाराष्ट्रातले प्रमुख मंत्री पंतप्रधानांना भेटायला गेले त्यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंशी पंतप्रधानांनी बंद दरवाजाआड चर्चा केली होती. त्यानंतरही शिवसेनेशी संबंध सुधारले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीला वेळ दिली जाते आहे का? बुचकळ्यात पाडले जातेय की मोदी आता राजकारणपल्याडचे स्टेटसमन झाले आहेत?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com