पार्थ पवार यांच्या ट्विटबाबत काय म्हणतात रोहित पवार? (व्हिडिओ)

पार्थ यांच्या ट्विट बाबत मला काही बोलायचं नाही, त्यांचा ट्विट तुम्ही कश्या पद्धतीने घ्यावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण मला महाराष्ट्राच्या पोलिसांवर विश्वास आहे आणि सुशांतला न्याय मिळाला पाहिजे, हे ही माझं मत आहे,'' या शब्दात रोहित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Rohit Pawar - Parth Pawar
Rohit Pawar - Parth Pawar

मुंबई : पार्थ यांच्या ट्विट बाबत मला काही बोलायचं नाही, त्यांचा ट्विट तुम्ही कश्या पद्धतीने घ्यावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण मला महाराष्ट्राच्या पोलिसांवर विश्वास आहे आणि सुशांतला न्याय मिळाला पाहिजे, हे ही माझं मत आहे,'' या शब्दात रोहित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडं सोपविण्याचा आदेश सुप्रीम कोर्टानं दिला आहे. मुंबई पोलिसांनी याबाबत सर्व सहकार्य करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहे.या प्रकरणाचं सर्व पुरावे महाराष्ट्र सरकारने सीबीआयला द्यावे, आदेशाचं पालनं करावं, असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिला आहे. त्यानंतर पार्थ पवार यांनी 'सत्यमेव जयते' असे ट्विट केले आहे. गेल्या आठवड्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवार अपरिपक्व असल्याचे वक्तव्य केले होते. त्या पार्श्वभूमीवर पार्थ यांनी हे ट्विट केल्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चा सुरु होणार आहे. 

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना विचारले असता ते म्हणाले, "पार्थने काय ट्विट केले हे मला माहित नाही. ते मी पाहिलेले नाही. सीबीआयने आपला निकाल दिला आहे. आता पुढे काय करायचे हे सरकार ठरवेल,'' पार्थ पवार यांनी केलेल्या ट्विटबाबत मात्र त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.  

अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी पार्थ पवार यांनी केली होती. त्यानंतर काही दिवसांतच त्यांनी राममंदिराला शुभेच्छा दिल्या होत्या. या दोन्ही भूमीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमीकेशी विसंगत होत्या. त्यानंतर आपण पार्थच्या म्हणण्याला कवडीचीही किंमत देत नाही, पार्थ अपरिपक्व आहे, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. आज सीबीआयचा निकाल आल्यानंतर पार्थ यांनी पुन्हा ट्विट करुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. दुसरीकडे अब बेबी पेंग्विन तो गयो! इट्स शो टाईम!, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार नितेश राणे यांनी युवा सेना नेते व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना उद्देशून केली आहे.
Edited By - Amit Golwalkar
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com