राज्यपाल विरूद्ध सरकार संघर्ष पेटला; मुख्य सचिव जाणार राजभवनावर - ncp leader nawb malik says chief secretary will go to raj bhavan-sj84 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

भाजपचे किरीट सोमय्या अखेर महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला रवाना
चरणजीत चन्नी होणार पंजाबचे नवे मुख्यमंत्री राज्याचे प्रभारी हरीश रावत यांची घोषणा
गणेशोत्सव विसर्जनामुळे पुण्यात मध्यवर्ती भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद
अंबिका सोनी यांनी पंजाबचे मुख्यमंत्रीपद नाकारले
पुरग्रस्तांसाठी सरकारची महत्वाची घोषणा ; नव्या निकषानुसार मदत

राज्यपाल विरूद्ध सरकार संघर्ष पेटला; मुख्य सचिव जाणार राजभवनावर

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 3 ऑगस्ट 2021

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे वारंवार महाविकास आघाडी सरकारच्या कामकाजात ढवळाढवळ करीत असल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. 

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) हे वारंवार महाविकास आघाडी सरकारच्या (MVA Government) कामकाजात ढवळाढवळ करीत असल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यामुळे राज्यपाल (Governor) विरुद्ध सरकार असा संघर्ष तीव्र झाला आहे. मंत्रिमंडळ बैठकीतही याचे पडसाद उमटले. यानंतर मुख्य सचिवांना राजभवनावर पाठवून राज्यपालांना मंत्रिमंडळाचा संदेश देण्याचा आदेश देण्यात आला आहे. 

याबाबत बोलताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) म्हणाले की, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर राज्यपाल वारंवार अधिकारात हस्तक्षेप करीत आहेत. राज्यपाल हे हिंगोली, परभणी आणि नांदेड दौऱ्यावर जाणार आहेत. या तीनपैकी दोन जिल्ह्यांत राज्यपाल विद्यापीठातील कार्यक्रमांना हजेरी लावतील. त्याला आमचा विरोध नाही. परंतु, या तिन्ही जिल्ह्यांत ते जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आढावा बैठक घेणार असून, याला आमचा आक्षेप आहे. राज्यपालांचा हा सरकारच्या कामात हस्तक्षेप आहे. 

हिंगोलीत विद्यापीठ नसतानाही राज्यपाल जिल्हाधिकारी कार्यालयात एका कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात ते आढावा बैठक घेणार आहेत. याचबरोबर परभणीतही प्रशासनासोबत आढावा बैठक घेण्यात येणार आहे. राज्य सरकारला कोणतीही पूर्वसूचना न देता राज्यपालांच्या या बैठका होत आहेत. ही सरकारच्या कामात ढवळाढवळ सुरू आहे. राज्यात सत्तेची दोन केंद्र असल्याचे भासवण्याचा प्रयत्न राज्यपालांकडून सुरू आहे. याबाबत आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली. राज्याचे मुख्य सचिव राजभवनात जाऊन राज्यपालांच्या सचिवांना याबाबत सूचना देतील, असे मलिक यांनी सांगितले. 

राज्यपाल कोश्यारी हे आधी उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. त्यांना अजूनही आपण मुख्यमंत्री आहोत असच वाटत आहे. त्यांना ते मुख्यमंत्री नाहीत हे समजावून सांगितलं जाईल. राज्यपाल हे राज्य सरकारच्या अधिकारावर गदा आणत आहेत. या आधी राज्यपालांनी कोरोना संदर्भात आढावा बैठका घेतल्या होत्या. त्यावेळी याची केंद्र सरकारकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर राज्यपालांनी अशा बैठका घेणे थांबवले होते. आता पुन्हा त्यांनी बैठका घेण्यास सुरुवात केली आहे, असे मलिक यांनी नमूद केले. 

हेही वाचा : नवीन मुख्यमंत्री एकटेच...आठवडा उलटूनही जोडीला कुणी मंत्री नाहीत

राज्यपालनियुक्त विधान परिषदेच्या 12 सदस्यांच्या मुद्द्यावर बोलताना मलिक म्हणाले की, राज्यपालनियुक्त १२ सदस्यांबाबत कायद्यात तरतुदी नाहीत. त्यांच्या नियुक्तीसाठी किती वेळ लावयचा हे स्पष्ट नाही. परंतु, मंत्रिमंडळाला ही नावे देण्याचा अधिकार आहे. त्यावर राज्यपाल लवकर सह्या करतील अशी अपेक्षा आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख