शहाण्याला शब्दाचा मार पण शहाण्याला! असं म्हणत पवारांचा राज्यपालांवर निशाणा

बारा आमदारांच्या नियुक्तीवरून महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपालांमध्ये या विषयावरुन नियमीत टिका-टिपण्णी होत असते.
NCP Chief Sharad Pawar criticize Governor Bhagat Singh Koshyari
NCP Chief Sharad Pawar criticize Governor Bhagat Singh Koshyari

मुंबई : राज्य सरकारने मंत्रीमंडळाच्या शिफारशीनुसार विधान परिषदेवर १२ आमदारांची नावे निश्चित करून प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवला होता. त्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी अजून निर्णय घेतलेला नाही. रविवारी राज्यपालांनी पुण्यात राज्य सरकार याबाबत आग्रह धरत नाही, तुम्ही का धरता?, असं टोला काँग्रेस आमदारांना लगावला होता. या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी समाचार घेतला आहे. (NCP Chief Sharad Pawar criticize Governor Bhagat Singh Koshyari)

बारा आमदारांच्या नियुक्तीवरून महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपालांमध्ये या विषयावरुन नियमीत टिका-टिपण्णी होत असते. राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते रविवारी पुणे आयुक्त कार्यालय ( कौन्सिल हॉल ) येथे स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, खासदार गिरीष बापट, काँग्रेसचे आमदार शरद रणपिसे आदींची उपस्थिती होती. 

राज्यपाल कोश्यारी मान्यवरांच्या भेटी घेत असताना शरद रणपिसे यांनी राज्यपालांना 12 आमदारांच्या नियुक्ती बाबत विचारले. यावेळी अजित पवार तेथेच उपस्थित होते. राज्यपाल म्हणाले, अजित पवार सोबत आहेत. ते माझे मित्र आहेत. राज्य सरकार आग्रह धरत नाही तुम्ही का धरता? असे म्हणत राज्य सरकारलाच टोला लगावला. यावेळी अजित पवारांनी हसत-हसत आज स्वातंत्र्य दिन आहे या विषयावर नंतर बोलेन असे सांगितले होते.

राज्यपालांच्या या वक्तव्यावर शरद पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत भाष्य केलं. ते म्हणाले, वाढत्या वयानं त्यांच्या लक्षात आलं नसेल. उद्धव ठाकरे यांचं पत्र अनेकदा गेलं होतं. नवाब मलिक हे हे गेले होते. मंत्रिमंडळाचं शिष्टमंडळ जाऊन आलं. शहाण्याला शब्दाचा मार पण शहाण्याला... त्यामुळं आता कुठेही शब्द वाया घालवणे गरजेचं नाही, असं म्हणत पवारांनी राज्यपालांवर निशाणा साधला.  

दरम्यान, १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर उच्च न्यायालयाने निर्णय देताना सांगितले की, संविधानिक पदाला आदेश देऊ शकत नाही. राज्यपालांकडे १२ आमदारांच्या नियुक्तीसाठी नावांची यादी देऊन नऊ महिने उलटून गेले आहेत. मात्र, अद्याप राज्यपालांनी त्यावर निर्णय घेतलेला नाही.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com