मोठी बातमी : मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीकडून अटक

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) अटक केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
ncb arrests samir khan son in law of minister nawab malik
ncb arrests samir khan son in law of minister nawab malik

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) आज अटक केली. मुच्छड पानवाला ड्रग्ज प्रकरणात त्यांना समन्स बजावण्यात आले होते. चौकशीनंतर एनसीबीने त्यांना अटक केली आहे. 

एनसीबीने वांद्रे पश्चिममधून एका कुरियरकडून गांजा जप्त केला होता. या चौकशीत उघड झालेल्या माहितीनुसार, खारमधील करण सजनानी याच्या घरी छापा टाकण्यात आला होता. त्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला होता. या प्रकरणी सजनानी, राहिला फर्निचरवाला, शाहिस्ता फर्निचरवाला आणि रामकुमार तिवारी यांना अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले होते. या प्रकरणाच्या तपासात समीर खान यांचे नाव समोर आले होते. त्यांना आज चौकशीसाठी एनसीबीने बोलावले होते. चौकशी झाल्यानंतर एनसीबीने त्यांना अटक केली. 

समीर खान यांचा विवाह नवाब मलिक यांची मुलगी निलोफर यांच्याशी झाला आहे. समीर खान आणि करण सजनानी यांच्यात गुगल पे द्वारे २० हजार रुपयांचा व्यवहार झाला होता, अशी माहिती एनसीबीच्या सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे ड्रग्स पुरवण्याच्या बदल्यात हा व्यवहार झाला असल्याचा संशय एनसीबीला होता. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एनसीबीने समीर यांना बोलावले होते. 

एनसीबीने गेल्या आठवड्यात ब्रिटीश नागरिक करण सजनानी आणि राहिला फर्निचरवाला यांच्याकडून 200 किलोचे ड्रग्ज जप्त केले होते. याप्रकरणी केम्प कॉर्नर येथील प्रसिद्ध मुच्छड पानावाला दुकानाचा मालक रामकुमार तिवारी यालाही अटक करण्यात आली असून, त्याला न्यायदंडाधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. गांजा, ड्रग्ज विकताना तिवारी पकडला गेला होता. त्यामुळे त्यालाही तुरुंगात टाकण्यात आले आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com