नवज्योतसिंग सिद्धू जिंकले..बनले पंजाबचे कॅप्टन! - navjot singh sidhu named as punjab congress chief | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

नवज्योतसिंग सिद्धू जिंकले..बनले पंजाबचे कॅप्टन!

वृत्तसंस्था
सोमवार, 19 जुलै 2021

पंजाब काँगेसमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढू लागला होता. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या विरोधात नवज्योतसिंग सिद्धू यांनी उघड बंड पुकारले होते. 

नवी दिल्ली : पंजाबमध्ये (Punjab) मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (Amarinder Singh) यांच्या विरोधात काँग्रेस (Congress) नेते नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu)  यांनी उघड बंड पुकारले होते. हे बंड शमवण्यात अखेर पक्ष नेतृत्वाला यश आले आहे. सिद्धू यांना प्रदेशाध्यक्षपदी बढती देण्यात आला असून, याला मुख्यमंत्र्यांनीही होकार दर्शवला आहे. 

पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के.सी.वेणूगोपाल यांनी सिद्धू यांची पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केल्याचे पत्र काढले आहे. याचबरोबर चार कार्यकारी अध्यक्ष नेमण्यात आले आहेत. हिंदू आणि दलित असा समतोल साधत या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यात संगतसिंग गिलझियान, सुखविंदरसिंग डॅनी, कुलजित नागरा आणि पवन गोयल यांचा समावेश आहे. 

सिद्धू यांना प्रदेशाध्यक्षपद देण्याच्या प्रस्ताव पक्षाने ठेवला होता. यावर कॅप्टन नाराज झाले आहेत. त्यांनी याबद्दल पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पत्र लिहिले होते. कॅप्टन यांनीही नुकतीच सोनिया गांधी यांची  भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी पक्षाच्या अध्यक्षा सांगतील तो तोडगा मान्य असेल, असे म्हटले होते. कॅप्टन यांचे पत्र मिळताच पक्ष नेतृत्वाने तातडीने रावत यांनी चॉपरने पंजाबमध्ये मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्या भेटीसाठी पाठवले होते. रावत यांच्या भेटीनंतर अखेर कॅप्टन यांनी हा प्रस्ताव मान्य केला होता. 

पंजाबमधील अंतर्गत वाद विधानसभा निवडणुकीआधी पक्षाला परवडणारा नसल्याने नेतृत्वाने पावले उचलण्यास सुरवात केली आहे. सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपद मागितले होते. पक्षाने मात्र, त्यांना प्रचारप्रमुखाची जबाबदारी देण्याची तयारी दर्शविली होती. सिद्धू हे प्रदेशाध्यक्षपदावर ठाम होते. अखेर सिद्धू यांची मागणी पक्षाच्या नेतृत्वाने मान्य केली आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांना हटवले गेले आहे. सिद्धू यांच्यासोबत चार कार्यकारी अध्यक्ष दिले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

हेही वाचा : पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार? पेट्रोलियम मंत्र्यांचा थेट सौदीच्या युवराजांना फोन 

मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात मागील 2017 च्या विधानसभा निवडणुकीपासून वाद सुरू आहे. भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या सिद्धू यांनी काँग्रेसच्या विजयानंतर पंजाबमध्ये उपमुख्यमंत्रिपद मिळेल, अशी शक्यता होती. परंतु, मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी याला विरोध केल्याने सिद्धू यांना दुसरे मंत्रालय देण्यात आले होते. तेव्हापासून दोघांचा वाद सुरू असून, आता सिद्धू यांनी उघड बंड पुकारले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख