नितीशकुमारांनी 2019 मध्ये जे बाणेदारपणे नाकारलं तेच 2021 मध्ये पदरात पाडून घेतलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा मेगाविस्तार करण्यात आला आहे. यात संयुक्त जनता दलाची एकाच जागेवर बोळवण करण्यात आली आहे.
narendrea modi offered only one berth to nitish kumar jdu
narendrea modi offered only one berth to nitish kumar jdu

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet) मेगाविस्तार करण्यात आला आहे. यात 43 जणांचा समावेश आहे. पंतप्रधानपदाच्या मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळात एक मंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिलेल्या संयुक्त जनता दलाची (JDU) अखेर एकाच जागेवर बोळवण करण्यात आली आहे. यामुळे बिहारमध्ये (Bihar) सत्तेत सहभागी असलेल्या भाजप आणि जेडीयूमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. 

भाजपने केंद्रात 2019 मध्ये सरकार स्थापन केल्यानंतर सहकारी पक्ष असलेल्या जेडीयूला केवळ एक मंत्रिपद देण्याची तयारी दाखवण्यात आली होती. त्यामुळे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केंद्रातील सत्तेत सहभागी होण्यास नकार दिला होता. आता झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात जेडीयूला केवळ एक मंत्रिपद देण्यात आले आहे. आधी एका जागेसाठी नकार देणाऱ्या जेडीयूला पुन्हा एकच जागा देऊन भाजपने जखमेवर मीठ चोळले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

याबद्दल बोलताना जेडीयूचा नेता म्हणाला की, हे अपमानास्पद आहे. सगळीकडे चार मंत्रिपदांची चर्चा सुरू असताना केवळ एक मंत्रिपद देण्यात आले आहे. सुरवातीला 2019 मध्ये ज्या मुद्दयावर विरोध केला त्याच मुद्द्यावर आता तडजोड करण्याचा हा प्रकार आहे. हा पक्षाला मिळालेली हीन वागणूक आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची धुरा 2019 मध्ये सांभाळली. त्यावेळी भाजपने घटक पक्षांना प्रत्येकी एकच मंत्रिपद दिले होते. यामुळे जेडीयूने केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होण्यास नकार दिला होता. लोकसभेतील संख्याबळाच्या आधारावर मंत्रिपदे मिळावीत, अशी भूमिका नितीशकुमार यांनी त्यावेळी घेतली होती. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर नितीशकुमार यांनी नरमाईची भूमिका घेतली होती. ते म्हणाले  होते की, जे झाले ते झाले. आता आदरणीय पंतप्रधान ठरवतील ते आम्हाला मान्य असेल. 

बिहारममध्ये सत्तेत सहभागी असलेल्या भाजप आणि जेडीयूमध्ये मागील काही काळापासून मतभेदाचे वातावरण आहे. भाजपने अरुणाचल प्रदेशमधील जेडीयूचे सर्वच्या सर्व आमदार फोडले होते. तेव्हापासून या वादाची ठिणगी पडली आहे. बिहारमध्ये जेडीयूचे संख्याबळ कमी असूनही नितीशकुमार हे मुख्यंत्रिपदी आहेत. यामुळे राज्यातील भाजपचे अनेक नेते उघडपणे नाराजी व्यक्त करीत आहेत. आता केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर दोन्ही पक्षांमधील अंतर आणखी वाढले आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com