कोरोना लसीकरणातून पंतप्रधान मोदींचा राजकीय संदेश...नेमकं केलं काय?

कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा देशात सुरू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कोरोना लस टोचून घेतली आहे.
narendra modi wear assam gamosa during covid 19 vaccination
narendra modi wear assam gamosa during covid 19 vaccination

नवी दिल्ली : देशात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. आजपासून 60 वर्षांवरील नागरिक आणि दुर्धर आजार असलेल्या 45 वर्षांवरील नागरिकांना कोरोना लस दिली जात आहे. है औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) कोरोना लशीचा पहिला डोस घेतला. या लसीकरणातून पंतप्रधान मोदींना राजकीय संदेश दिला आहे. 

या लसीकरणाबाबत स्वतः पंतप्रधानांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. कोरोनाच्या जागतिक महामारीमध्ये आपल्या डॉक्टरांनी आणि शास्त्रज्ञांनी केलेले काम उल्लेखनीय असल्याचे सांगत पंतप्रधानांनी या सर्वांचे कौतुक केले. आजपासू लस घेण्यास पात्र आहेत, त्या सर्वांनी लस घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

मोदींच्या लसीकरणात आज विधानसभा निवडणुका होत असलेल्या तीन राज्यांचा संदर्भ होता. मोदींनी आसाममधील पारंपरिक गमोसा म्हणजेच स्कार्फ परिधान केला होता. त्यांना लस देणाऱ्या परिचारिका या केरळ आणि पुदुच्चेरीतील होत्या. त्यांची नावे अनुक्रमे रोसम्मा अनिल आणि पी.निवेदा अशी आहेत. मोदींनी लसीकरणातून आगामी विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून आज संदेश देण्याची संधी सोडली नाही. विशेष म्हणजे मोदींनी घेतलेली लस ही भारत बायोटेक या कंपनीची कोव्हॅक्सिन ही आहे. ही लस संपूर्ण स्वदेशी बनावटीची लस असून, यातून मोदींनी मेड इन इंडियाचा नारा दिला आहे. 

जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास 16 जानेवारीला देशात सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन झाले होते. केंद्र सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यात पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. 

आता दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना दिली जात आहे. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील रुग्णांचाही यात समावेश आहे. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत मिळेल मात्र, खासगी रुग्णालयात यासाठी 250 रुपये मोजावे लागतील. यात 100 रुपयांच्या सेवा शुल्काचा समावेश असेल, असे सरकारने जाहीर केले आहे.  

सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  सध्या दोन कोरोना लशी उपलब्ध असून, आणखी सात कोरोना लशींवर काम सुरू असल्याचे सरकारने नुकतेच जाहीर केले होते. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी ही माहिती दिली होते. प्रत्येक भारतीयाला ही लस देण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. 

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com