नारायण राणे म्हणाले, "पैसे कमविणे हा शिवसेनेचा धंदा.. " - Narayan Rane said, "Making money is the business of Shiv Sena." | Politics Marathi News - Sarkarnama

नारायण राणे म्हणाले, "पैसे कमविणे हा शिवसेनेचा धंदा.. "

सरकारनामा ब्युरो
रविवार, 9 ऑगस्ट 2020

स्थानिक जनता ज्या दिशेने जाईल त्याच दिशेने आम्ही जाऊ," असे खासदार नारायण राणे यांनी स्पष्ट केलं.

सिंधुदुर्ग :  "नानारला प्रकल्पाला विरोध करणारी शिवसेना आता समर्थन करताना पाहायला मिळतंय. पैसे कमविणे शिवसेनेचा धंदा आहे. काल काय बोलतील आणि आज काय बोलण्यामध्ये बदल करतील सांगू शकत नाही, पूर्वी विरोध केला आणि आता समर्थन करतात, 100 टक्के समर्थन आहे, स्थानिक जनता ज्या दिशेने जाईल त्याच दिशेने आम्ही जाऊ," असे खासदार नारायण राणे यांनी स्पष्ट केलं.

वैभव नाईक म्हणाले की नानार प्रकल्पाला आमचं कोणतंही समर्थन नाही, स्थानिक जनतेचा विरोध होता. लोकसभेच्या निवडणुकीतचं भाजप बरोबर युती झालेली आहे. हा पुन्हा प्रकल्प कोणताही असेन तर शिवसेना हाणून पाडेल नारायण राणे यांना शिवसेनेवर आरोप करण्याची सवय आहे.
 
शिवसेनेसाठी नाणार हा विषय संपलेला आहे...

मालवण वायंगणी-तोंडवळी येथील नियोजित सी-वर्ल्ड प्रकल्प कमीत-कमी जागेत उभारण्यास शिवसेना तयार आहे; पण त्यासाठी स्थानिकांनी सहमती दिली पाहिजे. ही सहमती मिळाली तर आम्ही शासकीय अथवा खासगी संस्थेमार्फत हा प्रकल्प उभारू, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. नाणार हा विषय शिवसेनेसाठी संपलेला आहे. काही जण हा विषय पुन्हा काढून अस्तित्वासाठी प्रयत्न करीत आहेत, असा टोला सामंत यांनी यावेळी लगावला.

पालकमंत्री सामंत म्हणाले, ""शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी पक्षप्रमुख म्हणून यापूर्वीच नाणारविरोधी भूमिका घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या आमदार भास्कर जाधव यांनी या प्रकल्पाचे समर्थन केले तरी हा प्रकल्प होणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे; मात्र सी-वर्ल्ड प्रकल्पाला आमचा विरोध नाही. तेथील स्थानिकांचा विरोध आहे. त्यांनी सहमती दिली तरच हा प्रकल्प होईल.''

संबंधित लेख