पहिल्याच कॅबिनेटमध्ये मोदींनी राणेंना दिला होता 'हा' सल्ला

देशात ४५ टक्के रोजगारनिर्मीती करणाऱ्या क्षेत्राच्या मंत्रालयाची जबाबदारी मला दिली : नारायण राणे
Prime Minister Narendra Modi, Narayan Rane
Prime Minister Narendra Modi, Narayan Ranesarkarnama

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी ७ ऑक्टोबरला प्रशासकीय कारकिर्दीची दोन दशके पूर्ण केली आहे. ७ ऑक्टोबर २००१ रोजी त्यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. या निमित्ताने भाजप नेते केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी एक लेख लिहिला आहे. त्यामध्ये त्यांनी नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विविध कामांचा दाखला दिला आहे.

या लेखामध्ये राणे म्हणाले, देशात ४५ टक्के रोजगारनिर्मीती करणाऱ्या क्षेत्राच्या मंत्रालयाची जबाबदारी मला दिली, त्यावेळी पंतप्रधानांनी मला जाणीवपूर्वक सांगितले होते, समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत सत्तेचे लाभ पोचवता यायला हवेत. महिला, तरुणांचे जीवनमान उंचावणारी कामगिरी तुमच्याकडून मला हवी आहे. देशाच्या जीडीपीत दहा टक्के वाटा असणाऱ्या क्षेत्राचे मंत्रालय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्याकडे फार अपेक्षेने दिले आहे. अहोरात्र 'मिशन मोड'मध्ये असणाऱ्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाली, हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. मंत्रिमंडळाच्या माझ्या पहिल्याच बैठकीनंतर पंतप्रधानांनी मला सांगितले होते, की प्रत्येक क्षण मोलाचा आहे. तो सत्कारणी लावण्यासाठी तुमचा अनुभव आणि शक्ती पणाला लावा. देशाची अपेक्षापूर्ती आपल्याला करायची आहे.

Prime Minister Narendra Modi, Narayan Rane
मोठी बातमी : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारचे दसरा-दिवाळीसाठी मोठे गिफ्ट

नारायण राणे यांनी या लेखामध्ये नरेंद्र मोदी यांनी २० वर्षात देशासाठी केलेल्या महत्त्वाच्या कामांचा आढावा घेतला आहे. त्याच बरोबर नरेंद्र मोदी यांनी गुजरात तीन वेळा बहुमताने जिंकले. त्यानंतर भारतासारख्या खंडप्राय देशातही सलग दोन निवडणुका वाढत्या लोकप्रियतेसह आणि वाढत्या संख्याबळाने जिंकल्या, असल्याचे म्हटले आहे. मोदी जेव्हा दुसऱ्यांदा प्रंतप्रधान झाले तत्पूर्वी ३५ वर्ष देशात एकाही पक्षाला बहुमत मिळवता आलेले नव्हेत. ती कसर नोदी यांनी २०२९ मध्ये भरुन काढली.

Prime Minister Narendra Modi, Narayan Rane
स्मृती इराणी, जोतिरादित्य शिंदेंचं आधी सरकारमध्ये अन् आता पक्षात वाढलं वजन

गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ मोदी यांनी घेतली तेव्हा ते आमदारही नव्हते. आमदारकी सोडाच पण त्याआधी ते गावचे सरपंच किंवा शहराचे महापौरही नव्हते. संघटनात्मक कामात स्वतःला झोकून दिलेला हा माणूस थेट मुख्यमंत्रिपदी विराजमान झाला आणि त्यानंतर आजच्या तारखेपर्यंत जे घडले तो इतिहास जगापुढे आहे. ५० वर्ष मी महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात राजकारणात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थापासून ते लोकसभेपर्यंतच्या अनेक निवडणुका पक्षासाठी लढल्या, स्वतःही लढलो. तो अमुभव पाठीशी असल्याने मी पंतप्रधानांच्या अथक, अखंड २० वर्षाच्या प्रशासकीय प्रमुखपदाचे महत्त्व मी समजू शकतो. राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करताना २०१४ मध्ये जो झंझावत त्यांनी निर्माण केला आश्चर्यकारक होता. पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून त्यांनी एकही दिवस सुट्टी घेतली नाही.

त्याच बरोबर राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उज्ज्वला गॅस, दोन कोटी गरिबांना पंतप्रधान आवास योजनेतून थेट पैसे, शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम, ४५ कोटी सर्वसामान्यांचे बॅंकेत खाते, मुद्रा योजना, घर घर शौचालय, अशा विविध योजनांनी देशाच्या विकासात योगदान दिल्याचे म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com