कुंद्राचे पॉर्न फिल्म रॅकेट फडणवीस मुख्यमंत्री असतानाच सुरू होते; पटोलेंचा गौप्यस्फोट - nana patole says raj kundra racket was in devendra fadnavis period-sj84 | Politics Marathi News - Sarkarnama

कुंद्राचे पॉर्न फिल्म रॅकेट फडणवीस मुख्यमंत्री असतानाच सुरू होते; पटोलेंचा गौप्यस्फोट

वृत्तसंस्था
बुधवार, 21 जुलै 2021

पॉर्न फिल्मची निर्मिती केल्याप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. 

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पॉर्न फिल्मची निर्मिती केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. आता या प्रकरणात काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)  यांनी माजी मुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 

राज कुंद्रा यांच्या पॉर्न फिल्म रॅकेटवरुन मोठा गदारोळ उडाला आहे. यात पटोलेंनी थेट फडणवीस यांना ओढले आहे. फडणवीस सरकारच्या काळातच हे रॅकेट सुरु होता, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले म्हणाले की, राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असल्या पासून हे अश्लील फिल्म प्रकरण सुरू आहे. राज्यात सत्तांतर होऊन उद्धव ठाकरे सरकार आल्यानंतर हे प्रकरण उघड झाले आहे. 

पेगॅसिस प्रकरणावर बोलताना पटोले म्हणाले की, महाराष्ट्रात फोन टॅपिंग झाले होते हे मी आधीच सांगितले होते. मध्य प्रदेश आणि कर्नाटकात काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी फोन टॅपिंगचा वापर केला ही गंभीर बाब आहे. मोदी सरकार राज्यघटनेच्या विरोधात काम करत आहे. गोपनीयतेचा भंग भाजपकडून सुरू आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशी करावी. उद्या सायंकाळी केंद्र सरकारच्या विरोधात राजभवनासमोर आंदोलन करणार आहे. याचबरोबर राज्यपालांना निवेदन देण्यात येणार आहे, 

काँग्रेस महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार आहे, असे सांगून पटोले म्हणाले की, काँग्रेस नेत्यांचा कुठलाही अहवाल आलेला नाही. काँग्रेसचे मंत्री प्रामाणिकपणे काम करत आहेत. निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार हाय कमांडला आहे. 

हेही वाचा : प्रदेशाध्यक्ष अन् विरोधी पक्षनेत्यांच्या वादात काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवारच नाही 

उच्च न्यायालयाने कोरोना स्थिती गंभीर असल्याचे सांगितले आहे. सणापेक्षा नागरिकांचा जीव वाचविणे महत्वाचे आहे. कोणी सण साजरे करत असेल तर कायदा करण्यासाठी यंत्रणा आहे. महाराष्ट्रात ऑक्सिजन कमतरतेमुळे एकही मृत्यू झाला नाही हे सत्य आहे. मात्र, केंद्र सरकार मात्र सातत्याने खोट बोलत आहे. नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे घडलेली दुर्घटना भाजपच्या भ्रष्टाचारामुळे घडली. कोरोनात नागरिकांचा गेलेले जीव हे केंद्र सरकारचे पाप आहे. केंद्राने राज्याला योग्य लस पुरवठा केला नाही. लसीकरण न झाल्याने लॉकडाऊन ची वेळ राज्यावर आली आहे, असेही पटोले यांनी सांगितले. 

हेही वाचा : राज कुंद्राच्या रॅकेटमध्ये शिल्पा शेट्टीचा सहभाग? मुंबई पोलीस म्हणतात...

राज कुंद्रा याच्या विरोधात पुरेसे पुरावे असल्याचा दावा पोलिसांनी केली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असून, या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्याच्या दिशेने पोलिसांनी पावले टाकली आहेत. पॉर्न व्हिडीओ बनवून ते ऑनलाईन अपलोड करणा-या रॅकेट प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने राज कुंद्रा याला अटक केली. त्याला तीन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात तो मुख्य सूत्रधार आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख