आमदाराकडेच सहावे पद येताच काॅंग्रेस नेतेही चक्रावले : नाना पटोलेंनी घेतली अॅक्शन

काॅंग्रेसचे प्रभारी एच. के पाटील यांनीही नाराजी व्यक्त केली होती..
 Nana Patole .jpg
Nana Patole .jpgSarkarnama

यवतमाळ : काॅंग्रेसमध्ये एखादा निर्णय घेतला म्हणजे त्याची अंमलबजावणी होईलच, याची शाश्वती नसते. पण एका विधान परिषदेच्या आमदाराबाबत तातडीने निर्णय घेऊन त्याला जिल्हाध्यक्ष पदवारून हटविण्यात आले आणि त्या जागी नवीन अध्यक्ष नेमला सुद्धा! एवढ्या साऱ्या घडामोडी गेल्या चोवीस तासांत घडल्या. (Maharashtra Congress news update)

राज्यस्थानमधील उदयपूर येथे काॅग्रेस पक्षाचे चिंतन शिबीर पार पडले. त्यात `एक व्यक्ती, एक पद, एक कुटूंब, एक तिकीट` असा नवा संकल्प केला. पक्षाला नवसंजीवीनी देण्याचा प्रयत्न काॅग्रेसकडून झाला खरा. मात्र त्यास काही तास उलटत नाही तर विधान परिषदेचे आमदार तथा यवतमाळ जिल्हा काॅग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष डाॅक्टर वजाहत मिर्झा यांना काॅग्रेस हायकमांडने आधीच पाच पदे असताना महाराष्ट्र प्रदेश कमिटी अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्त केले. त्यावरून काॅग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमटला.

 Nana Patole .jpg
संभाजीराजे यांना एकमेव आधार उरला तो मित्र मानलेल्या फडणविसांचा!

त्यातच आज मुंबईत टिळक भवनात काॅग्रेस कमेटीची बैठक पार पडली.त्यात राज्याचे प्रभारी एच. के. पाटील यांनी आमदार मिर्झा यांची नियुक्ती अयोग्य असल्याचे म्हटल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर आमदार मिर्झा यांची जिल्हाध्यक्ष पदावरून हटवून त्यांच्या जागी अॅड.प्रफुल मानकर यांची प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणुन नियुक्ती केली आहे. याशिवाय मालेगाव शहर जिल्हा काॅंग्रेसच्या अध्यक्षपदी एजाज बेग यांची तर नंदुरबार जिल्हा काॅंग्रेसच्या अध्यक्षपदी शिरीषकुमार नाईक यांची नियुक्ती झाली.

 Nana Patole .jpg
संभाजीराजेंनी भाजपकडे उमेदवारी मागितली तर? : चंद्रकांतदादांनी स्पष्टच सांगितले...

मुंबई येथील टिळक भवन मध्ये पार पडलेल्या प्रदेश काँग्रेस कमिटीच्या बैठकीत राज्याचे प्रभारी एच. के. पाटील म्हणाले की, आमदार वजाहत मिर्झा यांची झालेली ही नियुक्ती अयोग्य असून त्यांनी राजीनामा द्यावा किंवा मला महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी या नात्याने या नियुक्तीला रद्द करण्याबाबत प्रस्ताव पक्षश्रेष्ठीकडे पाठवणार असल्याचे सांगितले. नाना पटोले यांनीही यावर तातडीने कार्यवाही करत "जिल्हाध्यक्ष पदावरून मिर्झा यांना मुक्त करण्यात आले आहे. "एक व्यक्ती-एक पद"या धोरणानुसार राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची माहिती मागवण्यात आली आहे. याबाबत मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याची भूमिका पक्षश्रेष्ठींनी घेतली असल्याचे पटोले यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com