मुंबईत वीज चोरीचा गुन्हा असलेला निघाला दहशतवादी!

जान मोहम्मद हा धारावीमध्ये राहणारा असून त्याला मुंबईतून दिल्लीला रेल्वेने जाताना कोटा येथे अटक करण्यात आली आहे.
मुंबईत वीज चोरीचा गुन्हा असलेला निघाला दहशतवादी!
Mumbai resident Jan Mohammad arrested by Delhi Police

मुंबई : दिल्ली पोलिसांनी मंगळवारी सहा दहशतवाद्यांना (Terrorist) अटक केली आहे. त्यापैकी जान मोहम्मद शेख मुंबईतील धारावी झोपडपट्टीत राहणारा आहे. तो दाऊद इब्राहीमच्या (D Company) गँगशी संबंधित असल्याचं समोर आलं आहे. वीस वर्षांपूर्वी त्याच्यावर फायरींगचा गुन्हा दाखल होता. तसेच वीज चोरीचा एक गुन्हाही त्याचावर आहे. दहशतवाद विरोधी पथकाकडून (ATS) त्याच्या हालचालींवर बारकाईनं लक्ष ठेवलं जात होतं. पण मंगळवारी त्याची लिंक थेट दहशतवाद्यांशी असल्याचं समोर आल्यानं पोलिसही हादरून गेले आहेत. (Mumbai resident Jan Mohammad arrested by Delhi Police)

पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या दोघांसह दिल्ली पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. देशात साखळी बॉम्बस्फोट करण्याचा त्यांचा कट होता, असं त्यांच्या चौकशीतून समोर आलं आहे. त्यामध्ये मुंबई लोकलही टार्गेटवर असल्याचे दावा केला जात आहे. त्यामुळं मुंबईसह महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. जान मोहम्मद हा धारावीमध्ये राहणारा असून त्याला मुंबईतून दिल्लीला रेल्वेने जाताना कोटा येथे अटक करण्यात आली आहे. 

महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख विनीत अगरवाल (Vineet Agarwal) यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, जान मोहम्मद हा वीस वर्षांपूर्वी डी कंपनीशी संबंधित आहे. आमचे त्याच्यावर लक्ष होते. मात्र, या प्रकरणाची आम्हाला काहीही माहिती नव्हती. वीस वर्षांपूर्वी त्याच्यावर पायधुनी पोलिस ठाण्यात फायरिंगचा गुन्हा दाखल आहे. तसेच त्याच्यावर वीज चोरीचाही गुन्हा दाखल आहे. त्याची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. त्याच्याकडं दिल्ली पोलिसांनी विस्फोटकं सापडली नाहीत, असं अगरवाल यांनी स्पष्ट केलं आहे.  

मुंबईतील अंडरवर्ल्ड नियंत्रणात आहे. मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी आम्हाला पूर्ण मोकळीक दिली आहे. मुंबईतून जान मोहम्मदला पकडण्यात आलं असलं तरी यात एटीएसचं अपयश नाही. थेट दिल्ली पोलिसांनी याबाबत यंत्रणांकडून माहिती देण्यात आली होती. एटीएस ही माहिती नव्हती. त्यानुसार दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 

दहशतवाद्यांकडे विस्फोटकं सापडली असली तरी महाराष्ट्रात काहीही सापडले नाही. जान मोहम्मदकडे पोलिसांनी विस्फोटक मिळाली नाहीत. मुंबईत रेकीही केलेली नाही. ते करणार होते. त्यामुळं यात एटीएसचं अपयश म्हणता येणार नाही, असंही अगरवाल यांनी स्पष्ट केलं आहे. जान मोहम्मदकडं अधिक चौकशी करण्यासाठी एटीएसची टीम दिल्लीला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in