शिल्पा शेट्टी म्हणाली, राज नेमकं काय करत होता माहिती नाही पण तो निष्पाप!

मुंबई पोलिसांनी शिल्पाचा जबाब नोंदवला असून, तिने यात तिचा पती निष्पाप असल्याचा दावा केला आहे.
mumbai police records statement of shilpa shetty after arrest of raj kundra
mumbai police records statement of shilpa shetty after arrest of raj kundra

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पॉर्न फिल्मची निर्मिती आणि वितरण केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. आता मुंबई पोलिसांनी शिल्पाचा जबाब नोंदवला असून, तिने यात तिचा पती निष्पाप असल्याचा दावा केला आहे.  

या प्रकरणी शिल्पा शेट्टीचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. कुंद्राचा लंडनमधील मेहुणा प्रदीप बक्षी हा अॅपचे काम पाहत होता, असे शिल्पाने म्हटले आहे. तिने अश्लील कंटेंट आणि पॉर्नोग्राफी यातील विसंगतीवर बोट ठेवले आहे. कुंद्रा हा पॉर्न फिल्मची निर्मिती करीत नसल्याचा दावा तिने केला आहे. हॉटशॉट्स अॅपवरील कंटेंट नेमका कोणत्या प्रकारचा होता, याची माहिती नसल्याचेही तिने म्हटले आहे. पती निष्पाप असल्याचाही दावा तिने केला आहे. दरम्यान,  पोलिसांनी कुंद्राकडून 48 टीबी डेटा जप्त केला असून, यात अश्लील फोटो, व्हिडीओंचा समावेश आहे. 

कुंद्राने पोलीस कोठडी रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. पोलीस जो कंटेंट अश्लील म्हणून दाखवत आहेत ते थेट अश्लील वर्तन नसून विशिष्ट इच्छुक वर्गासाठी तयार केलेल्या लघुपट आहे, असा दावा त्याने केला आहे. मला झालेली अटक बेकायदा असून, त्याची कायदेशीर पूर्वसूचना देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे महानगर दंडाधिकाऱ्यांनी सुनावलेली पोलीस कोठडीही बेकायदा आहे, असा दावा कुंद्राने केला आहे.

कुंद्राने याचिकेत म्हटले आहे की, पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार माझ्या लावलेले आरोप चुकीचे आहेत. त्याप्रमाणे कोणतेही कृत्य मी केलेले नाही.पोलीस जो कंटेंट अश्लील म्हणून दाखवत आहेत, ते थेट अश्लील वर्तन अथवा अश्लील संबंध नाहीत. हा कंटेंट लघुपटाच्या माध्यमातून दाखविला आहे. मागणीप्रमाणे विशिष्ट इच्छुक लोकांसाठी तयार केलेला आहे. 

कुंद्रा आणि त्याचा साथीदार रायन थार्प यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. कुंद्राला यामध्ये मुख्य सूत्रधार दाखवले आहे. त्याच्या बँक खात्यात दर दिवशी लाखो रुपये जमा होत होते. हॉटशॉट ॲप्सद्वारे हा प्रकार चालविला जात होता, असा आरोप पोलिसांनी केला आहे. राज कुंद्रा याच्या विरोधात पुरेसे पुरावे असल्याचा दावा पोलिसांनी केली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असून, या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्याच्या दिशेने पोलिसांनी पावले टाकली आहेत. पॉर्न व्हिडीओ बनवून ते ऑनलाईन अपलोड करणा-या रॅकेट प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने राज कुंद्रा याला अटक केली आहे. 

कुंद्रा याच्यानंतर नेरुळमधून रायन थार्प याला अटक करण्यात आली. कुंद्राने एका कंपनीच्या माध्यमातून 30 ते 40 अॅप्सची निर्मिती केलेली आहे. या कंपन्यांवर काही दिवस तो स्वतः संचालक राहायचा आणि नंतर राजीनामा देऊन विश्वासातील व्यक्तीला तिथे नेमायचा.  त्याने ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या शेकडो अश्लील व्हिडिओंचा डेटा मुंबई पोलिसांच्या हाती लागला आहे. या प्रकरणात आणखी 2 मॉडेल गुन्हे शाखेच्या रडारवर आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com