नाना पटोले भाजपच्या धमक्यांनी चिडले! म्हणाले हिम्मत असेल तर..

भाजपने केलेल्या आरोपांना नाना पटोले (Nana Patole) यांचे तिखट उत्तर
Nana Patole-Fadnavis
Nana Patole-FadnavisSarkarnama

मुंबई : भाजपच्या प्रदेश कायर्कारिणीत महाविकास आघाडी सरकार बरखास्त करण्याची सूचना आल्यानंतर त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी त्यास आव्हान दिले आहे. भाजपामध्ये हिम्मत असेल तर केंद्रातील मोदी सरकार बरखास्त करुन बॅलेटपेपरवर निवडणुका घेऊन दाखवा, असे प्रतिआव्हान त्यांनी दिले.

Nana Patole-Fadnavis
पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचा उमेदवार विजयी होणारच

भाजपचा समाचार घेताना नाना पटोले पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्षाचे नेते सैरभैर झाले आहेत. दोन वर्ष वारंवार हे सरकार पाडण्यासाठी भाजपाने अनेक प्रयत्न केले, राजभवनाच्या माध्यमातूनही प्रयत्न करुन काही उपयोग झाला नाही. सीबीआय, ईडी, आयकर, एनसीबी सारख्या केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातूनही मविआ सरकारमधील मंत्री व नेत्यांवर खोट्या केसेसच्या टाकून कारवाई करण्यात आली, महाराष्ट्राला बदनाम केले परंतु सरकार पडत नाही उलट ते भक्कम झाले आहे हे पाहून भाजपा नेत्यांना नैराश्याने ग्रासले आहे. या नैराश्येतूनच महाविकास आघाडीचे सरकार बरखास्त करण्याची भाषा केली गेली आहे. भाजपात हिम्मत असेल तर केंद्र सरकार बरखास्त करुन बॅलेटवर निवडणुका घ्याव्यात, भाजपाचा पराभव नक्की होईल.

Nana Patole-Fadnavis
नाना पटोलेंमुळे विदर्भातील कॉंग्रेसचे डझनभर नेते झाले प्रभारी...

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले की, भाजपा एसटी कर्मचाऱ्यांचे नुकसान करत आहे. भाजपा सत्तेत असताना एसटी विलिनीकरणाविरोधात भूमिका घेतली होती आणि आता तेच मागणी करत आहेत. केंद्रात सत्तेत असलेले भाजपाचे सरकार एलआयसी, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, भेल, अशा सरकारी कंपन्या उद्योगपतींना विकत आहे आणि येथे मात्र एसटीचे विलिनीकरण करण्याची भूमिका घेत आहे, ही भाजपची भूमिका दुटप्पी आहे, असे पटोले म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com