अनिल देसाई कुणाचे गळे दाबायला गेले नव्हते! 

विरोधी खासदारांनी महिला कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप केंद्रीय मंत्र्यांनी केला आहे.
MP Sanjay Raut criticize BJP leaders over Rajya Sabha clash
MP Sanjay Raut criticize BJP leaders over Rajya Sabha clash

मुंबई : अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी राज्यसभेत झालेल्या गोंधळावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर शरसंधान साधले आहे. संसदेतील मार्शल्सनी खासदार अनिल देसाई यांचं नाव घेत आरोप केले आहेत. त्यावर चिडलेल्या राऊत यांनी अनिल देसाई कुणाचे गळे दाबायला गेले नव्हते. मार्शल आरोप करतात, त्यावर संसद चालत नाही, असं सरकारला सुनावलं आहे. (MP Sanjay Raut criticize BJP leaders over Rajya Sabha clash)

राज्यसभेतील गदारोळावर विरोधक व सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. विरोधी खासदारांनी महिला कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप केंद्रीय मंत्र्यांनी केला आहे. तर मार्शल्सनीच महिला खासदारांना धक्काबुक्की केली, असा विरोधकांचा दावा आहे. काही मार्शल्स या प्रकारावर बोलले असून त्यांनी अनिल देसाई यांचं नाव घेतले आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांकडून विरोधकांवर जोरदार टीका केली जात आहे. 

यावर बोलताना राऊत म्हणाले, राज्यसभेत आलेले सुरक्षा विभागाचे कर्मचारी आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आहे. विधेयकांवर चर्चा न करता सरकार पळून गेले. संसदीय लोकशाहीला लागलेली ही कीड आणि विकृती आहे. मार्शल यापूर्वी कधी बोलावले नव्हते का? आम्ही भाजपसोबत होतो तेव्हा सावरकर मुद्द्यावरूनही मार्शल बोलावले होते. विधानसभेतही बोलावले जातात. पण राज्यसभेत बॉर्डर सिक्युरिटी प्रमाणे मार्शल आले होते. 

त्यादिवशी सकाळी अकरा पासून संसदेचे कामकाज शांतपणे सुरू होते. OBC विधेयकावर चर्चा करून एक मताने मंजूर करायचं ठरवलं होतं. पण इन्शुरन्स विधेयक लगेच न घेता विरोधकांना वेळ द्यावा हेही ठरलं. पण पियुष गोयल यांनी ते रेटण्याचा प्रयत्न केला. लोकशाहीचा गळा दाबत ते असे छाताडावर नाचत असतील तर विरोधकांनी बोलायचं नाही का, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. 

मार्शल हे संसदेचे कर्मचारी आहे. मार्शल काय रिपोर्ट देतात, काय बोलतात हे ठीक आहे. आठ मंत्री एकत्र येऊन विरोधी पक्षावर आरोप केले आहेत. लोकशाही आम्हालाही माहीत आहे. मार्शल बोलवण्याला आमचा विरोध नाही. पण ज्या पद्धतीने मार्शलच्या फौजा आणल्या ते चुकीचे होते. मार्शल्सनी खासदारांचे गळे दाबायचे बाकी ठेवले होते. आमच्या समोर लोकशाहीची हत्या होत असेल तर आम्ही आवाज उठवायचा नाही का?, असंही राऊत यांनी नमूद केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com