KDCC Bank Result : खासदार मंडलिकांनी विनय कोरेंना आपली ताकद दाखवून दिली...

कोल्हापूर जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत (KDCC Bank) आसुर्लेकर यांच्या उमेदवारीवरून वाद निर्माण झाला होता..
Sanjay Mandlik

Sanjay Mandlik

Sarkarnama

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बँकेच्या (KDCC Bank Election) निवडणुकीत ज्यावरून दोन पॅनेल पडले तेथे विरोधकांनी मोठा विजय मिळवला आहे. सत्तारूढ गटाचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, (Hasan Mushrif) पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) व आमदार विनय कोरे यांनी प्रतिष्ठेच्या ठरवलेल्या प्रक्रिया संस्था गटात विद्यमान संचालक व विरोधी पॅनेलचे प्रमुख खासदार प्रा. संजय मंडलिक व संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर मोठ्या मताधिक्यांनी विजयी झाले.

Sanjay Mandlik

Kdcc Bank Election : अखेर गुलाल यड्रावकरांवर ; राजू शेट्टींचा विरोध कुचकामी ठरला

या गटातील जागेवरूनच सत्तारूढ गट व शिवसेनेचे बिनसले होते. त्यात डॉ. कोरे यांनी श्री. आसुर्लेकर यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध केला होता. आसुर्लेकर पॅनेलमध्ये नसतील तर मीही तुमच्यासोबत नाही असा पवित्रा खासदार मंडलिक यांनी घेतला होता. कोरे यांच्या विरोधामुळे सत्तारूढ गटाने आसुर्लेकर यांना वगळले तर जागा वाटपाच्या वादातून प्रा. मंडलिकही बाहेर पडले. या दोघांनी या गटातून एकतर्फी विजय मिळवत या गटाचे आम्हीच शिलेदार असल्याचे दाखवून दिले. या दोघांचा विजय हा सत्तारूढ गटासाठी मोठा धक्का समजला जातो.

या गटातील सत्तारूढ गटाचे उमेदवार प्रदीप पाटील-भुयेकर व मदन कारंडे यांचा मोठा पराभव झाला. या दोघांना अनुक्रमे ११९ व १२२ मते मिळाली तर विजयी उमेदवार प्रा. मंडलिक यांना ३०६ तर आसुर्लेकर यांना ३२९ मते मिळाली.

Sanjay Mandlik

kdcc bank election : ''साहेब बँकेत सगळेच चोर, प्रशासक नेमा ; ५० रुपयांची ओवाळणी

नुरा कुस्तीची चर्चा

या गटात सत्तारूढ व विरोधी गटात नुरा कुस्ती झाल्याची चर्चा होती. प्रा. मंडलिक व आसुर्लेकर यांच्या विजयाने ही शक्यता अधिक गडद झाली आहे. हे दोन्ही उमेदवार सत्तारूढमध्ये हवेत अशी श्री. मुश्रीफ यांची इच्छा होती, तथाप कोरेंच्या विरोधामुळे तेही हतबल ठरल्याचे पॅनेलच्या निश्‍चितीवरून स्पष्ट झाले.

Sanjay Mandlik

KDCC Bank : राज्यमंत्र्यांच्या समर्थकांचे निकालाआधीच फटाके; तर विरोधकांची मिरवणूक

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत विकास संस्था गटात गडहिंग्लज तालुक्यातून विद्यमान संचालक संतोष पाटील, भुदरगडमधून विद्ममान संचालक व माजी आमदार के. पी. पाटील यांचे पुत्र रणजितसिंह पाटील, आजरातून सुधीर देसाई, शाहुवाडीतून रणवीरसिंह गायकवाड या सत्तारूढ गटाचे चार उमेदवार विजयी झाले.

सर्वाधिक चुरस ही शिरोळ तालुका विकास संस्था गटातील उमेदवार राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर आणि गणपतराव पाटील यांच्यात होती. माजी खासदार राजू शेट्टी हे स्वत: पाटील यांचे मतदान प्रतिनिधी म्हणून केंद्रात उपस्थित होते, त्यामुळे या लढतीकडे कोल्हापूर जिल्ह्याचेच नव्हे; तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. राजेंद्र यड्रावकर यांना ९८ मते मिळाली, तर गणपतराव पाटील यांना ५२ मते पडली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com