धक्कादायक : खासदार मोहनभाई डेलकर यांची मुंबईतील हॉटेलमध्ये आत्महत्या

दादरा नगर हवेलीतील अपक्ष खासदार मोहन डेलकर यांची मुंबईतील हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.
धक्कादायक : खासदार मोहनभाई डेलकर यांची मुंबईतील हॉटेलमध्ये आत्महत्या
mp mohan delkar committed suicide in mumbai hotel

मुंबई : दादरा नगर हवेलीतील अपक्ष खासदार मोहनभाई डेलकर यांनी मुंबईतील मरिन ड्राईव्ह येथील हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डेलकर हे मृतावस्थेच हॉटेलमधील खोलीत आढळून आले. त्यांनी आत्महत्येपूर्वी गुजराती भाषेत लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण पोलिसांनी उघड केलेले नाही.  

डेलकर यांच्या आत्महत्येमुळे मोठी खळबळ उडाली आहे. डेलकर हे आधी काँग्रेसमध्ये होते. त्यांनी अपक्ष म्हणून दादरा-नगर हवेलीतून लोकसभेची निवडणूक लढवली होती. यात त्यांनी भाजपच्या नथुभाई पटेल यांचा पराभव केला होता. त्यांनी 9 हजार 1 मतांनी विजय मिळवला होता. त्याआधी पटेल यांनी दोन वेळा डेलकर यांचा 2009 आणि 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत पराभव केला होता. तिसऱ्या वेळी मात्र, 2019 मध्ये डेलकर यांनी या पराभवाचा वचपा काढला होता. 

2009 आणि 2014 मध्ये डेलकर यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. मात्र, नंतर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीआधीच डेलकर काँग्रेसपासून दूर झाले होते. काँग्रेसचे उमेदवार प्रभू टोकिया यांना मागील लोकसभा निवडणुकीत केवळ 8 हजार 608 मते मिळाली होती. डेलकर हे आदिवासी नेते होते आणि त्यांना दादरा-नगर हवेलीचे तब्बल सहा वेळा प्रतिनिधित्व केले आहे. डेलकर यांच्या मागे पत्नी कलाबेन आणि अभिनव आणि दिविता ही मुले आहेत.  

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.