मोदींच्या नव्या मंत्रिमंडळातील 42 टक्के मंत्री गुन्हेगारी पार्श्वभूमीचे अन् 90 टक्के करोडपती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा मेगाविस्तार झाला आहे. यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या 78 झाली आहे.
in modi new cabinet 42 percent ministers have criminal background
in modi new cabinet 42 percent ministers have criminal background

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet) मेगाविस्तार झाला आहे. यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या 78 झाली आहे. मोदींच्या या नव्या मंत्रिमंडळातील 42 टक्के मंत्री गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून, 90 टक्के करोडपती आहेत, अशी धक्कादायक माहिती असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या (ADR) अहवालातून समोर आली आहे. 

मोदींच्या मंत्रिमंडळातील नव्या 15 कॅबिनेट आणि 28 राज्यमंत्र्यांचा शपथविधी 7 जुलैला झाला. यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या 78 वर पोचली आहे. या मंत्रिमंडळातील 33 सदस्यांवर (42 टक्के) फौजदारी गुन्हे दाखल आहेत. याचबरोबर 24 मंत्र्यांवर (31 टक्के) खून. खुनाच्या प्रयत्न आणि जबरी चोरी आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत, असे एडीआरच्या अहवालात म्हटले आहे. 

कूचबिहार लोकसभा मतदारसंघातील खासदार निसिथ प्रामाणिक यांची गृहराज्यमंत्री नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहे. 35 वर्षांचे प्रामाणिक मंत्रिमंडळातील सर्वांत तरुण सदस्य आहेत. जॉन बारला, प्रामाणिक, पंकज चौधरी आणि व्ही. मुरलीधरन यांच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल आहेत. मंत्रिमंडळात 70 मंत्री (90 टक्के) करोडपती आहेत. प्रत्येक मंत्र्याची सरासरी संपत्ती 16.24 कोटी रुपये आहे. जोतिरादित्य शिंदे, पीयूष गोयल, नारायण राणे आणि राजीव चंद्रशेखर या चार मंत्र्यांची संपत्ती 50 कोटी रुपयांहून अधिक आहे, असेही एडीआरच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

मोदी सरकारचे नवे मंत्रिमंडळ
कॅबिनेट मंत्री :

1. राजनाथ सिंह - संरक्षण मंत्री
2. अमित शहा - गृह, सहकार मंत्री
3. नितीन गडकरी - रस्ते परिवहन व महामार्ग
4. निर्मला सीतारमण - अर्थ व कंपनी व्यवहार
5. नरेंद्र सिंह तोमर - कृषी व शेतकरी कल्याण
6. डॅा. एस. जयशंकर - परराष्ट्र
7. अर्जून मुंडा - आदिवासी विकास
8. स्मृती इराणी - महिला व बाल विकास
9. पियुष गोयल - वाणिज्य व उद्योग, वस्त्रोद्योग, अन्न व ग्राहक व्यवहार
10. धर्मेंद्र प्रधान - शिक्षण व कौशल्य विकास
11. प्रल्हाद जोशी - संसदीय कार्य, कोळसा व खाण 
12. नारायण राणे - सुक्ष्म, लघु व मध्य उद्योग
13. सर्वानंद सोनोवाल - आयुष, बंदरे व जहाज बांधणी
14. मुख्तार अब्बास मंत्री - अल्पसंख्यांक मंत्री
15. विरेंद्र कुमार - सामाजिक न्याय 
16. गिरीराज सिंह - ग्राम विकास व पंचायत राज
17. ज्योतिरादित्य शिंदे - नागरी हवाई वाहतूक
18. रामचंद्र प्रसात सिंग - पोलाद
19. अश्विनी वैष्णव - रेल्वे, विज्ञान व तंत्रज्ञान
20. पशुपती कुमार पारस - अन्न प्रक्रिया उद्योग
21. गजेंद्र सिंह शेखावत - जलशक्ती
22. किरण रिजिजू - कायदा व न्याय
23. राजकुमार सिंह - उर्जा, अपारंपरिक उर्जा
24. हरदिपसिंह पुरी - पेट्रोलियम व नैसर्गिय वायू, नगर विकास
25. मनसुख मांडविया - आरोग्य व कुटूंब कल्याण, रासायनिक व खते
26. भुपेंद्र यादव - पर्यावरण, वन व हवामान बदल, कामगार व रोजगार
27. महेंद्र नाथ पांड्ये - अवजड उद्योग
28. परषोत्तम रुपाला - मत्स्यपालन, पशु संवर्धन व दुग्ध विकास
29. जी. किशन रेड्डी - सांस्कृतिक, पर्यटन
30. अनुराग ठाकूर - माहिती व प्रसारण, क्रीडा व युवक कल्याण

राज्यमंत्री (स्वतंत्र पदभार) :
1. राव इंद्रजित सिंह - नियोजन, सांख्यिकी, कंपनी व्यवहार
2. जितेंद्र सिंह - विज्ञान व तंत्रज्ञान, पंतप्रधान कार्यालय, अणुउर्जा, अवकाश संशोधन

राज्यमंत्री :
1. श्रीपाद नाईक - बंदरे, जहाज बांधणी, पर्यटन
2. फगनसिंह कुलस्ते - पोलाद, ग्राम विकास
3. प्रल्हाद सिंह पटेल - जलशक्ती, अन्न प्रक्रिया उद्योग
4. अश्विनी कुमार चौबे - ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण, पर्यावरण, वने व हवामान बदल
5. अर्जून राम मेघवाल - संसदीय कार्य व सांस्कृतिक
6. व्ही. के. सिंग - रस्ते परिवहन व महामार्ग व हवाई वाहतूक
7. क्रिशन पाल - उर्जा, अवजड उद्योग
8. रावसाहेब दानवे - रेल्वे, कोळसा, खाण
9. रामदास आठवले - सामाजिक न्याय
10. साध्वी निरंजन ज्योती - ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण, ग्राम विकास
11. संजीव कुमार बलयान - मत्स्य, पशुपालन व दुग्धविकास
12. नित्यानंद राय - गृह
13. पंकज चौधरी - अर्थ
14. अनुप्रिया सिंह पटेल - वाणिज्य व उद्योग
15. एस. पी. सिंग बघेल - कायदा व न्याय
16. राजीव चंद्रशेखर - कौशल्य विकास, माहिती तंत्रज्ञान
17. शोभा करंदलजे - कृषी
18. भानु प्रताप सिंह वर्मा - सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग
19. दर्शना जारदोश - वस्त्रोद्योग, रेल्वे
20. व्ही. मुरलीधरन - परराष्ट्र, संसदीय कार्य
21. मिनाक्षी लेखी - परराष्ट्र, सांस्कृतिक
22. सोम प्रकाश - वाणिज्य व उद्योग
23. रेणुका सिंह सरूटा - आदिवासी विकास
24. रामेश्वर तेली - पेट्रोलियम, कामगार व रोजगार
25. कैलास चौधरी - कृषी
26. अन्नपुर्णा देवी - शिक्षण
27. ए. नारायणस्वामी - सामाजिक न्याय
28. कौशल किशोर - नगर विकास
29. अजय भट - संरक्षण व पर्यटन
30. बी. एल. वर्मा - सहकार
31. अजय कुमार - गृह
32. देवुसिंह चौहान - दुरसंचार
33. भगवंत खुबा - अपारंपरिक उर्जा, रसायन व खते
34. कपिल पाटील - पंचायत राज
 35. प्रतिमा भौमिक - सामाजिक न्याय
36. सुभाष सरकार - शिक्षण 
37. भागवत कराड - अर्थ
38. राजकुमार रंजन सिंग - परराष्ट्र, शिक्षण 
39. भारती पवार - आरोग्य व कुटूंब कल्याण 
40. बिश्वेश्वर तुडू - आदिवासी, जलशक्ती
41. शंतनू ठाकूर - बदरे, जहाज बांधणी, जलवाहतूक
42. मुंजापरा महेंद्रभाई - महिला व बाल विकास, आयुष
43. जॅान बारला - अल्पसंख्यांक
44. एल. मुरूगन - मत्स्य, पशु संवर्धन व दुग्ध विकास, माहिती व प्रसारण
45. निसिथ परमाणिक - गृह, युवक कल्याण व क्रीडा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com