प्रलंबित रेल्वेमार्गासाठी आमदारांचा पाठपुरावा ; खासदारांचे दुर्लेक्ष..  - MLA pursuit for pending railways ; MP negligence  | Politics Marathi News - Sarkarnama

प्रलंबित रेल्वेमार्गासाठी आमदारांचा पाठपुरावा ; खासदारांचे दुर्लेक्ष.. 

हुकूम मुलाणी 
रविवार, 27 सप्टेंबर 2020

पंढरपूर विजयपूर या रेल्वेमार्गासाठी खासदाराकडून प्रयत्न अपेक्षित असताना त्यांच्या दुर्लक्षामुळे आमदार भारत भालके यांनी पाठपुरावा सुरू केला.

मंगळवेढा  : कर्नाटकातील भाविक पंढरपूरशी अधिक वेगाने जोडण्याच्या दृष्टीने प्रलंबित असलेल्या पंढरपूर विजयपूर या रेल्वेमार्गासाठी खासदाराकडून प्रयत्न अपेक्षित असताना त्यांच्या दुर्लक्षामुळे आमदार भारत भालके यांनी पाठपुरावा सुरू केला.

पंढरपूरच्या विठूरायाच्या भेटीसाठी महाराष्ट्र बरोबर सर्वाधिक जास्त भाविक कर्नाटकातून चालत येतात. परंतु त्यांचा परतीचा प्रवास सुखकारक होत नाही. तो प्रवास या भाविकांना त्यांचा प्रवास सुखकर व्हावा, या दृष्टीने तत्कालीन केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पंढरपूर विजयपूर हा 108 कि.मी.चा रेल्वेमार्ग  2014-15 मध्ये मंजूर करून घेतला. त्यासाठी 1294 कोटी खर्च अपेक्षित होता.

परंतु त्या मार्गाचे सर्वेक्षण झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने या मार्गासाठी निधी दिला नाही. त्यामुळे हा प्रश्न अद्याप रेंगाळलेल्या अवस्थेत आहे. या रेल्वेमार्गाचा प्रश्न मार्गी लागल्यास आणि पंढरपूर- लोणंद रेल्वेच्या माध्यमातून रेल्वेला कर्नाटकातील प्रवाशी व मालवाहतूक उत्तर भारतात जाण्यासाठी सोलापूर मार्गे वाढणारे अंतर व खर्च, वेळेची बचत होणार आहे. शिवाय पंढरपूर - मंगळवेढा या परिसरातील द्राक्षे, डाळींब, ज्वारी, साखर, व इतर शेतमाल दक्षिण व उत्तर भारतामध्ये पाठवणे शक्य होणार आहे. 

विजयपूर -पुणे  हे अंतर 374 किलोमीटर आहे व 314 किलोमीटर पंढरपूर मार्गे होताना 60 किलोमीटरची बचत होणार आहे. सुशील कुमार शिंदे यांच्यानंतर खासदार शरद बनसोडे यांनी राज्यात व केंद्रात सत्ता असताना नेटाने प्रयत्न करणे आवश्यक होते परंतु त्यांनी देखील त्यामध्ये म्हणावे तसे लक्ष दिले नाही, विद्यमान  उच्चशिक्षित खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्याकडून प्रयत्न होणे अपेक्षित असताना त्यांनी नुकतीच सोलापूर रेल्वे स्थानकाला सिद्धेश्वराचे नाव देण्यासंदर्भातील मागणी करण्यात आली. त्याच बरोबर त्यांच्या मतदारसंघात असलेल्या पंढरपूर विजापूर रेल्वे मार्गाचा विषय केंद्रात सत्ता असताना त्यांनी मार्गी लावणे अपेक्षित होते, परंतु दुर्दैवाने त्या संदर्भात काही प्रयत्न केल्याचे दिसले नाही.

परंतु दहावी शिक्षण झालेल्या कुस्तीच्या आखाड्यातून राजकीय आखाड्यात डावपेच मारण्यात तरबेज झालेल्या आमदार भारत भालके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल, रेल्वे राज्यमंत्री, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे इंग्रजीमध्ये 31 ऑगस्ट रोजी पत्रव्यवहार करून त्यासंदर्भातील हा विषय मार्गी लावण्याची विनंती केली आहे या पत्राला केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ता. 4 सप्टेंबर  उत्तर देत नियमानुसार आवश्यक ती कारवाई करण्यासंदर्भात संबंधित रेल्वे बोर्ड संचालकाला पत्राद्वारे दिले. त्यामुळे एकंदरीत भारत भालके यांच्या रेल्वे संदर्भातील पाठपुराव्याबाबत नागरिकातून समाधान व्यक्त केले जात आहे
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख