नितीन राऊतांची सावरकरांवर वादग्रस्त पोस्ट; सोशल मीडियात झाले ट्रोल

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काही दिवसांपूर्वी सावरकरांविषयी एक वक्तव्य केलं होतं.
Nitin Raut
Nitin Raut

मुंबई : काँग्रेसचे नेते व ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Sawarkar) यांच्याविषयी फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट टाकली आहे. इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या काळात छापण्यात आलेली दोन टपाल तिकीटं त्यांनी फेसबुकवर टाकली आहेत. त्यामध्ये एक तिकीट सावरकर यांचे तर दुसरं तिकीट एका माकडावर काढण्यात आलेलं होतं. या टपाल तिकीटांच्या किंमतीवर राऊतांनी वादग्रस्त भाष्य केलं आहे.

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी काही दिवसांपूर्वी सावरकरांविषयी एक वक्तव्य केलं होतं. महात्मा गांधींच्या सांगण्यावरूनच सावकरांनी इंग्रजांची माफी मागितली होती, असं ते म्हणाले होते. त्यावरून पुन्हा एकदा वाद-प्रतिवाद सुरू झाले होते. त्याचपार्श्वभूमीवर राऊत यांनी ही टपाल तिकीटं आपल्या फेसबूक अकाऊंटवर पोस्ट केली आहेत. सावरकर यांच्यावरील टपाल तिकीट 20 रुपयाचे तर माकडावरील टपाल तिकीट 100 रुपयांचे आहे.

Nitin Raut
अजित पवारांचा मुख्यमंत्री योगींना संदेश; म्हणाले...

त्याचआधारे राऊत यांनी ही पोस्ट टाकली आहे. 'इंदिरा गांधींच्या काळात ही टपाल तिकिटं छापण्यात आली होती. माकडाची किंमत पाच पटीने जास्त आहे,' असं राऊत म्हणाले आहेत. त्यावरून वाद निर्माण झाला असून अनेकांनी त्यांना ट्रोल केले आहे. सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनीही राऊत यांच्या या पोस्टवर नाराजी व्यक्त करत त्यांच्यावर टीका केली आहे.

चौधरी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हणतात की, सावरकरांच्या बाबतीत आपल्या मनात कोणतेही विचार असू शकतात. मी स्वतः सावरकरांचा कट्टर विरोधक आहे आणि राहीन. पण एका कॅबिनेट मंत्र्याच्या पेज वर ही पोस्ट नक्कीच शोभत नाही. गांधीजींचे तीन समकालीन विरोधक होते- सावरकर, आंबेडकर आणि जिना. पण या तिघांवरही गांधीजींनी कधीही कठोर वैयक्तिक टीका केल्याची नोंद नाही.

अर्थात हे काॅग्रेसच्या या मंत्री महोदयांना सांगण्यात अर्थ नाही. गांधी कळले असते तर त्यांच्या पक्षावर दुसऱ्या एका हिंदुत्ववादी पक्षाच्या आश्रयानं सत्ता उपभोगण्याची वाईट वेळ आली नसती. आजचा सत्तेतला मुख्य पक्ष हिंदुत्ववादी पक्ष आहे आणि तो सावरकरांना भारतरत्न द्यावं याचा खुलेआम पुरस्कार करत आहे तरीही नितीन राऊत सत्तेला चिटकून का बसले आहेत, असा सवार चौधरी यांनी केला आहे.

सावरकरवादी मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात मी राहणार नाही अशी तात्विक भूमिका त्यांनी घ्यायला हवी. सत्तेत बसतांना सावरकर चालतात आणि मतं मागतांना गांधी हवे ही दुटप्पी भूमिका आहे. सगळ्यात गंमतीचा भाग असा की सावरकरांवरचं हे टपाल तिकीट त्यांच्या पक्षानंच केंद्रात सत्तेत असतांना काढलं आहे! तेव्हा ही पोस्ट त्यावेळच्या स्वतःच्याच सर्वोच्च नेत्यांवर टीका करणारी म्हणली पाहिजे. राऊत हे स्वतःला इंदिरा गांधींपेक्षाही जास्त सेक्युलर समजतात असा या पोस्टचा दुसरा अर्थ आहे, असं चौधरी यांनी नमूद केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com