विधान परिषदेच्या यादीबाबत फडणवीस अन् राज्यपालांचे आधीच ठरलंय!

विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नावांची चर्चा सुरू असताना हसन मुश्रीफ यांनी या प्रकरणी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
minister hassan mushrif made big revelation about mlc list
minister hassan mushrif made big revelation about mlc list

कोल्हापूर : विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्‍त 12 जागांसाठीच्या नावांची शिफारस राज्य मंत्रिमंडळ करणार आहे. या नावांची उत्सुकता कायम असली तरी त्यावरुन गदारोळ सुरू  झाला आहे. आता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी या प्रकरणी मोठा गौप्यस्फोट केला आहे. मंत्रिमंडळाने दिलेली नावे बाजूला ठेवण्याबाबत राज्यपाल व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी एका खासगी कार्यक्रमात सांगितले होते, असा दावा मुश्रीफ यांनी केला आहे. 

मुश्रीफ म्हणाले, माजी मंत्री व आमदार विनय कोरे यांच्या मातोश्रींचे नुकतेच निधन झाले.  त्यावेळी कोरे यांचे सांत्वन करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील व जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने गेले होते. या ठिकाणी काही वेळातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे दाखल झाले. सांत्वन केल्यानंतरच पाचच मिनिटात त्यांनी राज्यपालांकडून निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या 12 सदस्यांबाबत धाडसी वक्‍तव्य केले होते. 

मंत्रिमंडळाने 12 नावांची शिफारस केली तरी ही नावे बाजूला ठेवण्याबाबत राज्यपाल व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली आहे. त्यामुळे आमदार कोरे तुम्ही काही काळजी करु नका, असा सल्ला या वेळी  पाटील यांनी दिला. मात्र, काही वेळाने  पाटील यांना त् ठिकाणी भैय्या माने उपस्थित असल्याचे ध्यानात आल्यानंतर त्यांनी सारवासारव  केली, असे मुश्रीफ यांनी सांगितले. 

मुश्रीफ म्हणाले, आमदार पाटील यांनी केलेल्या वक्‍तव्याचा राज्यातील जनतेने गांभीर्याने विचार करणे आवश्‍यक आहे. भाजपकडून चाललेले राजकारण हे अत्यंत घातक आहे. अशा पध्दतीने निवडी झाल्या तर काही खरे नाही. भाजपचे नेते आता राज्यपालांना अडचणीत आणत आहेत. असे राजकारण योग्य नाही. महाविकास आघाडीच्या प्रत्येक निर्णयाला खो घालण्याचे काम ते राज्यपालांच्या माध्यमातून करत आहेत. राज्य सरकारचे सर्व निर्णय अडवले जात आहेत. अध्यादेश परत पाठवले जात आहेत. महत्वाच्या विधेयकांवर सह्या होत नसून जनतेनेच आता या सर्वाचा विचार करावा. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com