दुर्दैवी योगायोग : पत्नीच्या मृत्यूनंतर पाचच दिवसांत मिल्खासिंग यांनी जग सोडलं

धावपटू मिल्खासिंग यांचे निधन झाले आहे. मिल्खासिंग आणि त्यांच्या पत्नीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
milkha singh dies five days after death of wife nirmal kaur
milkha singh dies five days after death of wife nirmal kaur

नवी दिल्ली : प्रसिद्ध धावपटू मिल्खासिंग (Milkha Singh) यांचे ९१व्या वर्षी काल (ता.18)  रात्री निधन झाले. मिल्खासिंग यांना कोरोनाचा (Covid19) संसर्ग झाला होता. त्यांची तब्येत अचानक खालावल्याने त्यांना चंडिगडच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. मिल्खासिंग यांच्या पत्नी निर्मलकौर (Nirmal Kaur) निधनानंतर पाचच दिवसांत मिल्खासिंग यांचे निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

गेल्या आठवड्यात त्यांची मिल्खासिंग यांच्या पत्नी निर्मलकौर (८५) यांचे कोरोनामुळे निधन झाले.  त्यावेळी आयसीयूमध्ये असल्याने त्यांना पत्नीच्या अंत्यसंस्कारासाठीही उपस्थित राहता आले नव्हते. पत्नीच्या निधनानंतर पाचच दिवसांत मिल्खासिंग यांचे निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले आणि पुत्र गोल्फपटू जीव मिल्खासिंग हे आहेत. 

मिल्खासिंग आणि निर्मलकौर यांचा प्रेमविवाह होता. निर्मलकौर यांच्या मृत्यूनंतर केवळ पाचच दिवसांत मिल्खासिंग यांनी जगाचा निरोप घेतला आहे. या दुर्दैवी योगायोगाची चर्चा होत आहे. पत्नीचे शेवटचे दर्शनही घेऊ न शकलेले मिल्खासिंग अखेर तिच्या निधनानंतर पाच दिवसांत जग सोडून गेले आहेत. 

मिल्खासिंग यांनी १९५८ आणि १९६२च्या एशियन गेम्समध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. ऑलिंपिक आणि राष्ट्रकुलसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिल्खासिंग यांना मिळाली होती. मिल्खासिंग हे फ्लाईंग सिख (Flying Sikh) नावाने प्रसिद्ध होते. त्यांना १९५९ मध्ये पद्मश्री पुरस्कारांने गैारविण्यात आले होते. 

मिल्खासिंग यांच्या निधनाचे वृत्त कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी टि्वट करुन  शोक व्यक्त केला. मोदींनी म्हटले आहे की, एका महान खेळाडूला आज गमावले आहे. मिल्खासिंग यांच्यासाठी भारतीयांच्या मनात एक खास जागा होती. त्यांच्या व्यक्तिमत्वाने अनेक जण त्यांचे चाहते होते. त्यांच्या निधनाची वार्ता ऐकल्यानंतर मला दु:ख झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com