राज्यपालांचा आधी हल्लाबोल अन् नंतर 24 तासांतच कोलांट उडी

राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यातील वाद उफाळून आला आहे.
Satyapal Malik
Satyapal Maliksarkarnama

नवी दिल्ली : मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यातील वाद उफाळून आला आहे. आता मलिकांनी मोदींसोबत झालेल्या बैठकीबाबत खळबळजनक दावा केल्याने मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या वादात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनाही ओढले आहे. एका राज्यपालानेच अमित शहांचा हवाला देऊन हा दावा केल्याने याबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात होते. आता 24 तासांतच राज्यपालांनी कोलांट उडी मारली आहे.

मोदींशी भांडण झाल्यानंतर त्यांनी मला अमित शहांना भेटायला सांगितले होते. सांगितल्यानुसार मी शहांना भेटलो. त्यावेळी मोदी हे वेडे झाले आहेत, असे शहा म्हणाले. तुम्ही अजिबात कुणाची काळजी करू नका. तुम्ही नियमितपणे भेटायला येत जा, असेही शहा मला म्हणाले, असा गौप्यस्फोट मलिक यांनी केला होता. मलिक यांनी मोदींनाच वेडे ठरवल्याने खळबळ उडाली आहे.

यावरून मोठा गदारोळ झाल्यानंतर मलिक यांनी खुलासा केला आहे. मलिक म्हणाले की, अमित शहा हे मोदींचा आदर करतात. लोक मोदींची दिशाभूल करीत आहेत, असे शहा मला म्हणाले होते. एक दिवस पंतप्रधानांनी या तीन कृषी कायद्यांबद्दल वस्तुस्थिती समोर येईल, असेही त्यांनी म्हटले होते. शहा हे मोदींबद्दल चुकीचे हेतूने काहीही बोलले नाहीत. त्यांनी मला केवळ माझ्या मुद्द्यांवर विचार केला जाईल, असे सांगितले होते.

Satyapal Malik
समीर वानखेडेंचा कार्यकाळ वाढवण्यासाठी भाजप नेत्यांकडून दिल्लीत लॉबिंग!

मलिकांनी हरियाणा येथील दादरीमध्ये एका सामाजिक कार्यक्रमात संवाद साधताना ही माहिती उघड केली होती. ते म्हणाले होते की, शेतकरी आंदोलनावरून (Farmers Protest) मी पंतप्रधान मोदींना भेटलो होतो. त्यावेळी पाच मिनिटांच्या आतच आमचा वाद झाला होता. ते खूप अहंकारात होते. मी जेव्हा त्यांना म्हणालो की, 500 लोकांचा मृत्यू झाला आहे. तेव्हा ते म्हणाले, माझ्यासाठी मेले आहेत का?

Satyapal Malik
आमदार नितेश राणेंनी अटक टाळण्यासाठी उचललं पाऊल

मोदींच्या या वक्तव्यानंतर वाद झाल्याचे मलिकांनी सांगितले. तुमच्यासाठी हे लोक मेले आहेत. कारण तुम्हा राजा बनले आहात, असं आपण मोदींना म्हणाल्याचे मलिकांनी सांगितले. यावरून त्यांच्याशी भांडण झाल्याचेही मलिकांनी स्पष्ट केलं आहे. पंतप्रधानांनी त्यानंतर मला अमित शहांना भेटायला सांगितले. मी शहांनाही भेटलो. जेव्हा कुत्रा मरतो तेव्हा पंतप्रधान शोक संदेश पाठवतात. पण शेतकरी मृत्यूवर ते गप्प राहिले, असंही मलिक म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com