पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् अमित शहांच्या रणनीतीसमोर विरोधकांची दमछाक

Gujarat election : गुजरात निवडणुकीमध्ये भाजपला घेरण्याची तयारी केलेले काँग्रेस आणि आम आदमी पार्टी काही प्रमाणात बॅक फूटवर गेल्याचे दिसत आहे.
Narendra Modi, Amit Shah
Narendra Modi, Amit ShahSarkarnama

Gujarat election : गुजरात निवडणुकीमध्ये भाजपला घेरण्याची तयारी केलेले काँग्रेस आणि आम आदमी पार्टी काही प्रमाणात बॅक फूटवर गेल्याचे दिसत आहे. गुजरात निवडणुकीसाठी भाजपने (BJP) मोठी रणनिती आखली आहे. त्यांच्या राष्ट्रीय प्रचार यंत्रणेपुढे काँग्रेस आणि आप कमी पडत आहेत.

गुजरात निवडणुकीच्या प्रचारत स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) उतरले आहेत. त्यांच्या प्रचार सभा आणि रोड शोचा धमाका सुरु आहे. तर भाजपची केंद्रीय यंत्रणा घरोघरी जाऊन प्रचार करत आहे. अनेक राज्याचे मुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार यांच्यावर प्रत्येक जिल्ह्याती आणि मतदार संघांची जबाबदारी देण्यात आली आहे.

Narendra Modi, Amit Shah
Bawankule:अमित शहा आणि फडणवीस सक्षम आहेत, धमकी देणाऱ्याला हुडकून काढतील

दुसरीकडे मागील निवडणुकीत काँग्रेसने (Congress) आक्रमक प्रचार करत भाजपला घेरले होते. त्यावेळी दिवंगत नेते अहमद पटेल यांची रणनिती, सामाजीक आंदोलनातील आक्रमक चेहरा हार्दीक पटेल आणि गुजरातचे प्रभारी असलेले युवा नेते दिवंगत राजीव सातव यांनी काँग्रेसच्या प्रचाराची धुरा समर्थपणे संभाळात भाजपला अडचणीत आणले होते. मात्र, आता काँग्रेस सोबत हे तीनही नेते नाहीत. हार्दीक पटेल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

भाजपने मध्यंतरी पूर्ण मंत्रीमंडळच बदले होते. त्यातच अनेक मंत्री आणि आमदारांनाही तिकीट नाकारले आहे. दुसरीकडे २७ वर्षांची एंटी इनकंबेंसी, त्यातच निवडणुकीच्या तोंडावर झालेली मोरबी दुर्घटना, कोरोना काळातील गौरसोयी हे मुद्दे उचलण्यात विरोधक अपयशी ठरताना दिसत आहेत.

दिल्लीची निवडणूक जाहीर झाल्यामुळे आपला मोठा फटका बसला आहे. आपची मोठी यंत्रणा दिल्लीत अडकली. तर गुजरातमधील प्रादेशीक प्रचार यंत्रणेवरच त्यांना निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे. दुसरीकडे राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरु असल्याने अनेक मोठे नेते त्यात गुंतलेले आहेत. मात्र, गुजरातमधली प्रचारात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि युवा ब्रिगेड उतरली आहे. राहुल गांधींच्या दोनस सभा होणार आहेत. मात्र, काँग्रेसही भारत जोडो यात्रा, आणि गुजरात अशा दोन ठिकाणी विभागली आहे. त्यात नरेंद्र मोदी यांचे हे राज्य असल्यामुळे भाजपने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे.

Narendra Modi, Amit Shah
मोदींच्या रोजगार मेळाव्याची राष्ट्रवादीने उडवली खिल्ली : ‘मालक, निदान लाखाचा तरी आकडा गाठायचा की...’

केंद्रीय निवडणूक आयोगाने हिमाचल-प्रदेश आणि गुजरातच्या निवडणुका एकाच वेळी न घेता वेगवेगळ्या घेतल्या आहेत. त्यातच दिल्ली महापालिकेची निवडणुकही जाहीर केली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने भाजपला मदत होईल, अशाच पद्धतीने निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. मात्र, यामुळे भाजपला गुजरातमध्ये फायदा झाला आहे. त्यांची संपूर्ण यंत्रणा येथे जोरदार प्रचार करताना दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in