सेन्सॉर बोर्डाच्या परवानगीविनाच 'मी लाभार्थी' ची जाहीरात 

सेन्सॉर बोर्डाच्या परवानगीविनाच 'मी लाभार्थी' ची जाहीरात 

मुंबई : ' मी लाभार्थी' या जाहिरातीवरून राज्यात गोंधळ सुरू असतानाच सरकार या जाहिरातीच्या परवानगीवरून पुन्हा अडचणीत सापडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 1 जानेवारीपासून राज्यात विविध वृत्त वाहिनीवर 'मी लाभार्थी' आणि आपले सरकार ही जाहिरात सुरू आहे. मात्र या जाहिरातीसाठी सरकारने आतापर्यंत सेन्सॉर बोर्डाची कोणतीही परवानगी घेतली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

प्रसिद्धीमाध्यमात आणि विशेषतः वृत्त वाहिनीवर एखादी जाहिरात प्रसिद्ध करायची असल्यास त्यासाठी सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र आवश्‍यक असते. मात्र राज्य सरकारने 
मागील अकरा महिन्यापासून सुरू केलेली 'मी लाभार्थी' ही जाहिरात सेन्सॉर बोर्डाची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे माहिती अधिकारात उजेडात आली आहे. 

बार्शी तालुक्‍यातील रा. उपळाई रोडवायकुळे येथील निखिल मस्के या माहिती अधिकार कार्यकर्त्यानी ही माहिती समोर आणली आहे. त्यांनी सरकारकडे 1 जानेवारीपासून सुरू असलेल्या मी सरकार आणि मी लाभार्थी या दोन जाहिराती प्रदर्शित करण्यासाठी सेन्सॉर बोर्डाची परवानगी घेतली असल्यास त्याची प्रत द्यावी अशी मागणी केली होती. त्यावर जाहिरातीच्या वरिष्ठ सहायक संचालक जन माहिती अधिकारी यांनी सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र उपलब्ध नसल्याची माहिती दिली.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com