#Maratha Reservation ; उदयनराजेंच्या निवासस्थानी लवकरच बैठक.. - #Maratha Reservation ; Meeting soon at Udayan Raje residence | Politics Marathi News - Sarkarnama

#Maratha Reservation ; उदयनराजेंच्या निवासस्थानी लवकरच बैठक..

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 7 ऑक्टोबर 2020

उदयनराजे यांच्या जलमंदिर येथील निवास्थानी लवकरच मराठा क्रांती मोर्चीची राज्यव्यापी बैठक होणार आहे.

सातारा : मराठा आरक्षणाबाबत छत्रपती उदयनराजे यांच्या जलमंदिर येथील निवास्थानी लवकरच मराठा क्रांती मोर्चीची राज्यव्यापी बैठक होणार असल्याचे आयोजन अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सांगितले. स्वतः उदयनराजे या बैठकीचे नियोजन करणार आहेत. 

सध्या मराठा समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. सरकार त्याकडे गांभीर्याने पाहत नसल्याने उदयनराजेंनी राज्यव्यापी बैठक बोलवली असल्याचे बोलले जात आहे. या बैठकीला मराठा क्रांती मोर्चाचे राज्यातील महत्वाच्या व्यक्तींना बोलावणार असून या बैठकीत मोर्चा बाबत आणि समाजाच्या प्रलंबित मागण्यांबाबत काही महत्वाचे निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

नरेंद्र पाटील म्हणाले की दोन्ही छत्रपतींच्या कुटुंबात कोणीही वाद लावू नये. दोन्ही राजे एकत्रित कार्यक्रमाला येणार आहेत. छत्रपती उदयनराजे यांनी कोल्हापूरची संपत्ती मागितली नाही किंवा छत्रपती संभाजी राजे यांनी सातारची संपत्ती मागितली नाही. शाहू महाराजांनी सर्वप्रथम मराठा समाजासाठी आग्रही भूमिका घेतली आहे.
 आमच्यासाठी दोन्ही राजांचं महत्तवाचं स्थान आहे.

  
पंकजा मुंडे हलक्या कानाच्या; त्यामुळे ही वेळ आली : विनायक मेटे यांची टीका
 
पुणे : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या अतिशय हलक्या कानाच्या आहेत. त्यांच्या अवतीभोवती असणाऱ्या काही कथित हितचिंतकांनी त्यांना वास्तविकता जाणवू न देता खोटेनाटे सांगून दिशाभूल करण्याचाच प्रयत्न केला.  त्यामुळेच स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर माझे पंकजा यांच्याबरोबर माझी राजकीय गणिते जुळली नाहीत. त्यांच्या या स्वभावाचा फटका त्यांना बसला आणि परळी विधानसभा  मतदारसंघात दारुण पराभव झाला, असे परखड मत शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष व आमदार विनायक मेटे यांनी मांडले. भाजपशिवाय त्यांच्या चुका कोणता पक्ष पोटात घालणार? त्यामुळे त्या भाजप सोडू शकत नाहीत, असा दावाही त्यांनी केला. 

"सरकारनामा"ला दिलेल्या मुलाखतीत मेटे यांनी अनेक राजकीय बाॅम्बगोळे टाकले. मराठा आरक्षणाचे मारेकरी कोण, अशोक चव्हाण यांचे नक्की कोठे चुकले, मराठ्यांपुढचे पर्याय काय, यातील राजकारण कसे आहे, यावर मेटे यांनी या मुलाखतीत भाष्य केले आहे.  ही मुलाखत सरकारनामावर सात आॅगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता प्रकाशित होणार आहे.

आपले सर्व राजकीय पक्षांशी चांगले संबंध आहेत, असा दावा मेटे यांनी मुलाखतीत केल्यानंतर पण तुमच्याच बीड जिल्ह्यातील पंकजा मुंडे यांच्याशी तुमचे पटत नाही, असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी यास पंकजांचा स्वभाव कारणीभूत असल्याचे स्पष्टीकरण दिले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख