सर्वसामान्यांना मास्क वापरण्यास सांगणाऱ्या नेत्यांनाच विधिमंडळात नकोत मास्क...

महाराष्ट्राच्या विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले. या अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्र्यांसह अनेक आमदार तोंडावरील मास्क काढून बोलू लागल्याचे चित्र आज दिसले.
many ministers and mlas pull down masks while speaking in maharashtra assembly
many ministers and mlas pull down masks while speaking in maharashtra assembly

मुंबई : राज्यातील कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असताना मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले. मात्र, अधिवेशनादरम्यान, नेमके उलट चित्र दिसून आले. मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेत्यांसह अनेक आमदार मास्क काढून बोलत असल्याचे दिसले. यामुळे सर्वसामान्यांना एक न्याय आणि नेत्यांना वेगळा न्याय असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

पावसाळी अधिवेशनाचा आज पहिलाच दिवस असल्याचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी सर्व आमदारांना मास्क वापरण्यास सांगितले. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मास्क घालून बोलणे अवघड जात असल्याची तक्रार केली. ते म्हणाले की, मास्क घालून बोलताना बाहेर पडणारा श्वास चष्म्यावर जात आहे. त्यामुळे हातातील कागद वाचण्यात अडचण येते. 

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज शोकप्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही तोंडावरील मास्क खाली सरकवला. ठाकरे ही चष्मा घालतात. मास्कमुळे बोलणे अवघड जात असल्याची कबुली त्यांनी दिली. 

विधान भवनाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार, मंत्री, अधिकारी, कर्मचारी वर्ग आणि पत्रकार अशा एकूण 2 हजार 115 जणांची कोरोना चाचणी आठवडाभरात करण्यात आली आहे. यातील 58 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. 

दरम्यान, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर व जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी घेतला होता. त्या वेळी बोलताना पवार म्हणाले होते की,  कोरोनाचा फैलाव रोखण्यात नागरिकांचा सहभागही महत्वाचा आहे. बरेच नागरिक मास्क शिवाय फिरताना दिसतात, ही गंभीर बाब आहे. मास्क शिवाय रस्त्यावर फिरताना आढळणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल करावा.

प्रकाश जावडेकर म्हणाले होते, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा विविध प्रकारच्या उपाययोजना राबवित असून  नागरिकांनी समाजात वावरताना घ्यावयाच्या खबरदारीबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. मास्क शिवाय रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांकडून पोलीस विभागाने दंड वसूल करावा.

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com