नवाब मलिकांच्या आरोपानंतर मनीष भानुशालीने केला धक्कादायक दावा

मलिक यांनी मनीष भानुशाली आणि के.पी.गोसावी हे दोघे क्रूझवरील छाप्याआधीच एनसीबीच्या कार्यालयात होते, असा आरोप केला आहे.
नवाब मलिकांच्या आरोपानंतर मनीष भानुशालीने केला धक्कादायक दावा
Manish Bhanushali

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी अंमली पदार्थ विरोधी विभागाच्या (NCB) कामकाजावर आक्षेप घेत अनेक गंभीर आरोप केले आहेत. मलिक यांनी भाजपचा पदाधिकारी मनीष भानुशाली आणि खासगी गुप्तहेर के.पी.गोसावी हे दोघे क्रूझवरील छाप्याआधीच एनसीबीच्या कार्यालयात होते, असा आरोप केला आहे. त्यानंतर भानशाली यांनी हे आरोप फेटाळून लावत मोठा दावा केला आहे.

एका वृत्तसंस्थेशी बोलताना भानुशाली यांनी महाराष्ट्रात आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा केला आहे. महाराष्ट्राबाहेरील एका मित्राने एक ऑक्टोबरला पार्टी होणार असल्याची माहिती दिली होती. तिथे डॅग्जचा वापरही केला जाणार होता, असं भानुशाली यांनी सांगितले. मी मागील 10 ते 15 वर्षांपासून भाजपचा कार्यकर्ता आहे. मी केवळ भाजपचा कार्यकर्ता असल्यानं निशाना साधला जात आहे. नवाब मलिक यांचे जावई डॅग्ज प्रकरणात अडकल्यानं माझ्यावर आरोप केले जात आहेत, असे भानुशाली म्हणाले.

Manish Bhanushali
पंतप्रधान मोदींना मिळालेल्या वस्तूंच्या लिलावात एका भाल्याने केली कमाल!

नेहमी दिल्लीत ये-जा असलेले भानुशाली म्हणाले, पक्षाशी संबंधित अजूनही कुणीही माझ्याशी संपर्क केलेला नाही. पण मी सुरक्षेसाठी अधिकाऱ्यांकडे जाणार आहे. भाजपचा आर्यन खान किंवा इतरांच्या अटकेशी काहीच संबंध नाही. महाराष्ट्रात माझ्या जीवाला धोका आहे. मी माझ्या सुरक्षेसाठी दिल्लीत आलो आहे, असं भानुशाली यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावरही हल्लाबोल केला. त्यांनी म्हटले आहे की, काल समीर वानखेडे यांनी पत्रकार परिषदेत 8 ते 10 जणांना अटक करण्यात आली, असे म्हटले होते. प्रत्यक्षात 8 जणांना अटक करण्यात आली आहे. किती जणांना अटक करण्यात आली याची खात्रीशीर माहितीही वानखेडे देऊ शकले नाहीत. आणखी दोघांना या प्रकरणात अडकवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे का?

Manish Bhanushali
शेतकऱ्यांच्या बाजूने बोलणाऱ्या वरूण गांधींना भाजपनं दिला डच्चू!

मलिक यांनी आरोप केल्यानंतर एनसीबीचे महासंचालक ग्यानेश्वरसिंह आणि विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी पत्रकार परिषद घेतली. मलिक यांनी भाजप पदाधिकारी आणि खासगी गुप्तहेर असल्याचा आरोप केलेले दोघे या प्रकरणात पंच आहेत, अशी कबुली एनसीबीने दिली आहे. ते म्हणाले होते की, आमच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप निराधार आहेत. सर्व आरोप हे पूर्वग्रहदूषित आहेत. या प्रकरणात 10 पंच होते. या प्रकरणातील आरोपी आणि आरोप करणारे हे न्यायालयात जाण्यास जाऊ शकतात. आम्ही योग्य प्रक्रियेचे पालन केले असून, याचे उत्तर आम्ही न्यायालयात देऊ.

Related Stories

No stories found.