एक्झिट पोल : बंगालमध्ये भाजपच्या जागा वाढणार पण ममतादीदी गड राखणार - mamata banrejee will retain west bengal predicts exit polls | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

एक्झिट पोल : बंगालमध्ये भाजपच्या जागा वाढणार पण ममतादीदी गड राखणार

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 एप्रिल 2021

देशात चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली असून एक्झिट पोलचे अंदाज जाहीर झाले आहेत. 

नवी दिल्ली : देशातील चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली आहे. आता हाती आलेल्या एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याचा अंदाज आहे. भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या पश्चिम बंगालच्या लढतीत सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या गड राखण्यात यशस्वी ठरतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

'एनडीटीव्ही'ने सर्व एक्झिट पोलची सरासरी काढून व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, तृणमूलला 149 जागा मिळवून ममता बॅनर्जी सत्ता ताब्यात ठेवतील. याचवेळी भाजपच्या जागांमध्ये मोठी वाढ होऊन पक्षाला 116 जागा मिळतील. काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या आघाडीला 16 जागा मिळतील. 

निवडणूक आयोगाकडून चारे राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. यात पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम, केरळ ही चार राज्ये आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभेच्या निवडणुका 27 मार्च ते 29 एप्रिल कालावधीत झाल्या आहेत. या पाच राज्यांपैकी सध्या केवळ आसाममध्येच भाजपची सत्ता आहे. पुदुच्चेरीमध्ये सरकार कोसळल्यानंतर आता काँग्रेसची पाचपैकी एकाही राज्यात सत्ता नाही. आसाममधील सत्ता टिकविण्यासह अन्य राज्यांत सत्तेत येण्यासाठी भाजपने जोर लावला  होता. 

ओपिनियन पोल ममतांच्या बाजूने 
निवडणुकीआधी जाहीर झालेल्या टाईम्स नाऊ-सी-व्होटरच्या ओपिनियन पोलनुसार (जनमत चाचणी) सत्ताधारी तृणमूल काँग्रेस राज्यातील सत्ता कायम ठेवण्यात यश मिळवेल. भाजपने तृणमूलमधील अनेक नेत्यांना फोडून पक्षाला खिंडार पाडले होते. याचा फायदा काही प्रमाणात भाजपला होईल. राज्यात भाजपच्या जागा वाढतील. मात्र, सत्तेपासून भाजप दूरच राहील. तृणमूलच्या जागांमध्ये घट होण्याचा अंदाज आहे. मागील विधानसभा निवडणुकीत तृणमूलला एकूण 294 जागांपैकी 211 जागा मिळाल्या होत्या. या वेळी पक्षाला 154 जागा मिळतील आणि पक्षाला बहुमत मिळेल. भाजपला मागील निवडणुकीत केवळ 3 जागा मिळाल्या होत्या. या वेळी भाजपला 107 मिळतील. जागा वाढूनही भाजपला राज्यातील सत्तास्थापनेचे स्वप्न साकार करता येणार नाही. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख