ममतादीदींचे राष्ट्रीय राजकारणात पडलं पाऊल...बंगाल सोडून आता दिल्लीत बस्तान - mamata banerjee appointed tmc party leader in parliament-sj84 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

आमदार आशुतोष काळे शिर्डी संस्थानचे अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी जगदीश सावंत यांची नियुक्ती
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची याचिका फेटाळली
जगातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, अदर पूनावाला
तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांची वर्णी
अभिनेता सोनू सूदच्या घरावर आयकर विभागाचा छापा

ममतादीदींचे राष्ट्रीय राजकारणात पडलं पाऊल...बंगाल सोडून आता दिल्लीत बस्तान

वृत्तसंस्था
शनिवार, 24 जुलै 2021

पश्‍चिम बंगालमध्ये भाजपला नामोहरम केल्यानंतर मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होण्याची तयारी करीत आहेत. 

नवी दिल्ली : पश्‍चिम बंगालमध्ये (West Bengal) भाजपला नामोहरम केल्यानंतर मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (TMC) प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होण्याची तयारी करीत आहेत. पुढील आठवड्यातील ममता दिल्ली (Delhi) दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर संसदीय पक्षाच्या नव्या अध्यक्षा म्हणून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यामुळे ममतांनी कोलकत्यातून दिल्लीत येण्यासाठी पहिले पाऊल टाकल्याचे मानले जात आहे. 

तृणमूलचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी ही माहिती दिली. देशात 2024 मध्ये पुढील लोकसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ममतांनी राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होण्याची रणनीती आखली आहे. याची सुरवात त्या संसदेमध्ये उतरुन करणार आहेत. सध्या संसदेत तृणमूल काँग्रेसचा बालेकिल्ला सुदीप बंदोपाध्याय हे लढवतात. लोकसभेवर निवडून न येताही संसदेत पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या निवडक नेत्यांमध्ये ममता बॅनर्जी यांचा आता समावेश होणार आहे. याआधी सोनिया गांधी यांची 1998 मध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी संसदीय नेतेपदाची जबाबदारी पार पाडली होती. 

ममता बॅनर्जी या सात वेळा खासदार राहिल्या आहेत. याआधीही त्यांचे मार्गदर्शन आम्हाला मिळत होते. हा आमचा पक्षाचा राजकीयदृष्ट्या घेतलेला निर्णय आहे., असे डेरेक ओब्रायन यांनी सांगितले. सध्या पेगॅसस प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. तृणमूल काँग्रेसने या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे.  केंद्रीय माहिती तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हातातील उत्तराचा कागद सभागृहामध्ये फाडून टाकल्याप्रकरणी तृणमूल खासदार शंतनू सेन यांना निलंबित करण्यात आले आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ममतांचे राष्ट्रीय राजकारणात येणे महत्वाचे ठरणार आहे. 

हेही वाचा : परमबीरसिंह यांचा पाय खोलात..बिल्डरला मागितली 4 कोटी 68 लाखांची खंडणी 

राजकारण्यांसह पत्रकार, उद्योजक व इतर काही व्यक्तींचे मोबाईल पेगॅसस स्पायवेअरद्वारे हॅक करण्यात आल्याचं स्पष्ट झाल्यानंतर भारतात मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. या यादीत खुद्द वैष्णव यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल, काँग्रेसचे नेते राहुल गांधी,  राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर, तृणमूलचे खासदार अभिषेक बॅनर्जी, अशोक लवासा, महिला व बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी व राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या निकटवर्तीयांचाही समावेश आहे. 

इस्राईलमधील ‘एनएसओ ग्रुप’ कंपनीने पेगॅसस स्पायवेअर तयार केला आहे. पॅरिस येथील ‘फॉर्बिडन स्टोरीज’ आणि अॅम्नेस्टी इंटरनॅशनल या संस्थांनी ही बाब उघडकीस आणत ५० हजार मोबाईल क्रमांकाची यादीच तयार केली. ही माहिती त्यांनी जगभरातील इतर १६ वृत्तसंस्थांना दिली. या यादीनुसार शोध घेतल्यानंतर ५० देशांमधील एक हजारांहून अधिक जणांवर पाळत ठेवल्याबाबतचे पुरावे मिळाले. ‘एनएसओ’ने ज्यांना हे स्पायवेअर विकले होते, त्यांच्याकडूनच पाळत ठेवण्याचा प्रकार घडला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख