रिया चक्रवर्ती शवागारात गेलीच कशी? मुंबई पोलिसांसह कूपर हॉस्पिटल अडचणीत

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूचा तपास सीबीआयने सुरू केला आहे. यात रोज नवनवीन धक्कादायक बाबी समोर येत आहेत.
maharashtra state human rights commission sent a notice to cooper hospital and mumbai police
maharashtra state human rights commission sent a notice to cooper hospital and mumbai police

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सुरू केला आहे. सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणी, स्वयंपाकी नीरजसिंह यांच्यासोबत  चार्टर्ड अकाउंटंट संदीप श्रीधर यांची सीबीआयने चौकशी केली होती. या प्रकरणी सुरवातीपासून टीकेचे धनी झालेले मुंबई पोलीस आता अडचणीत आले आहेत. आता महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने मुंबई पोलिसांसह कूपर हॉस्पिटलला नोटीस बजावली आहे. 

सुशांतच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी सीबीआयचे 15 जणांचे पथक मुंबईत 20 ऑगस्टला दाखल झाले आहे. सीबीआयचे पथक संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (डीआरडीओ) गेस्ट हाऊसवर थांबले आहे. सीबीआय पथकाने चौकशी सुरू केली आहे. सीबीआय पथकाने पथकाने मुंबईचे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांची भेट घेतली होती. या प्रकरणाशी निगडित कागदपत्रे सीबीआयने मुंबई पोलिसांकडून ताब्यात घेतली आहेत. सीबीआयने सुशांतचे शवविच्छेदन करणाऱ्या कूपर रुग्णालयातील डॉक्टरांचीही चौकशी केली आहे. 

सुशांतच्या मृत्यू झाला त्यावेळी 14 जूनला घरात उपस्थित असलेल्यांमध्ये सिद्धार्थ पिठाणी आणि नीरज यांचा समावेश होता. नीरज  याची सीबीआयने मंगळवारी सलग पाचव्या दिवशी चौकशी केली होती. सिद्धार्थ याचीही काल सलग चौथ्या दिवशी चौकशी करण्यात आली. याचबरोबर सुशांतचा चार्टर्ड अकाउंटंट संदीप श्रीधर यांचीही काल चौकशी करण्यात आली. काही वेळ चौकशी झाल्यानंतर ते तेथून बाहेर पडले. याचबरोबर मुंबई पोलिसांचे पथकही काल सकाळी गेस्ट हाऊसवर येऊन सीबीआय पथकाला भेटले. काही वेळ चर्चा केल्यानंतर मुंबई पोलिसांचे पथक तेथून बाहेर पडले होते. 

सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह मुंबई महापालिकेच्या कूपर रुग्णालयातील शवागारात ठेवण्यात आला होता. सुशांतच्या मृतदेहाचे शवविच्छेदनही त्यावेळी झालेले नव्हते. मात्र, मुंबई पोलीस आणि कूपर हॉस्पिटलने रिया चक्रवर्ती हिला शवागारात जाऊन सुशांतचा मृतदेह पाहण्याची परवानगी दिली होती. यावरुन आता मोठा गदारोळ उडाला आहे. रियाने तेथे जाऊन पुरावे नष्ट केले असतील, असा आरोपही होत आहे. याची गंभीर दखल महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने घेतली आहे. आयोगाने मुंबई पोलिसांसह कूपर हॉस्पिटलला नोटीस बजावून या प्रकरणी खुलासा करण्याचे निर्देश दिले आहेत. 

सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत होते. या प्रकरणी पोलिसांनी 56 जणांचे जबाब नोंदविले होते. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा समावेश होता. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com