मद्य महागणार...अर्थसंकल्पात मद्यप्रेमींसाठी बॅड न्यूज!

राज्याच्या अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला आहे. यात मद्यावरील कर वाढवण्यात आला आहे.
maharashtra state government raises vat on liquor in budget
maharashtra state government raises vat on liquor in budget

मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे अडचणीत आलेल्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात मद्यावर 5 टक्के मूल्यवर्धित कर (व्हॅट) वाढवण्यात आला आहे. स्वदेशी ब्रॅण्डेड आणि नॉन-ब्रॅण्डेड मद्यावरील व्हॅट 60 वरून 65 टक्के करण्यात आला आहे. मद्यावरील सर्व प्रकारच्या व्हॅटचा दर 30 वरून 40 टक्के करण्यात आला असल्याने राज्यात आता मद्य महागणार आहे. 

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीचा दुसरा अर्थसंकल्प आज सादर केला. राज्याचे कर संकलनाचे उद्दिष्ट आणि आर्थिक गणित बसवण्यासाठी अजित पवार यांनी मद्यावर करवाढीची प्रस्ताव ठेवला आहे. देशी मद्याचे ब्रॅण्डेड आणि नॉन-ब्रॅण्डेड असे दोन प्रकार निश्‍चित केले आहेत. त्यानुसार देशी ब्रॅण्डेड उत्पादन शुल्काचा दर निर्मिती मूल्याच्या 220 टक्के अथवा 187 रुपये प्रतिलिटर यापैकी अधिक असेल तो लागू होईल. त्यातून राज्याला अंदाजे 800 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळणे अपेक्षित आहे. 

मद्यावरील मूल्यवर्धित कर कायद्याच्या अनुसूचीनुसार सध्याचा मूल्यवर्धित दर 60 टक्‍क्‍यांवरून 65 टक्के करण्यात आला आहे. तसेच, मूल्यवर्धित कर कायद्यातील काही तरतूदीनुसार मद्यावर सध्या असलेल्या मूल्यवर्धित कराचा दर 35 वरून 40 टक्के वाढवण्याचे प्रस्तावही मांडण्यात आला आहे. यामुळे राज्याला 1 हजार कोटींचा अतिरिक्त महसूल मिळेल, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत शून्य टक्के व्याजाने पीककर्ज 

कोरोना काळात राज्यातील कृषी क्षेत्राने चांगली प्रगती केली असून, राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना झाला असल्याचे अजित पवारांनी सांगितले. कोरोनामुळे सर्व क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मंदी असताना राज्यातील कृषी क्षेत्राने चांगली प्रगती केली. या काळात राज्यातील कृषी आणि सलग्न क्षेत्रात 11.7 टक्के इतकी वाढ पहायला मिळाली आहे. त्यामुळे शेती आणि शेतकरी यांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे पवारांनी सांगितले. 

तीन लाखांपर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना आणि त्याची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज मिळणार असल्याची घोषणा पवार यांनी केली. राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना झाला असून ,31 लाख 23 हजार शेतकऱ्यांना १९ हजार कोटी कर्जमाफीची रक्कम वर्ग करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com