धक्कादायक : देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील 11 जिल्हे

देशातील कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या आता 40 लाखांवर पोचली आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक आहे.
maharashtra andhra pradesh and karnataka told to prevent spread of covid19
maharashtra andhra pradesh and karnataka told to prevent spread of covid19

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. मागील 24 तासांतील देशातील अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांमध्ये महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील रुग्णांचे प्रमाण 46 टक्के आहे. याचबरोबर कोरोनामुळे मागील 24 तासांत मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये या तीन राज्यांतील रुग्णांचे प्रमाण 52 टक्के आहे. यामुळे केंद्र सरकारने या तिन्ही राज्यांना तंबी दिली असून, कोरोनाचा मृत्यूदर एक टक्क्याच्या खाली राखण्यास सांगितले आहे. केंद्राने राज्यांना सर्वाधिक बाधित जिल्ह्यांची यादी दिली असून, यात महाराष्ट्रातील 11 जिल्हे आहेत. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या राज्यांनी चाचण्या अधिक वेगवान कराव्यात. याचबरोबर प्रभावी वैद्यकीय व्यवस्थापन करुन मृत्यूदर नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात. देशात मागील 24 तासांत आढळलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांमध्ये 47 टक्के रुग्ण या तीन राज्यांतील आहेत. यात एकट्या महाराष्ट्राचा वाटा 22 टक्के आहे. याचबरोबर मागील 24 तासांत देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 52 टक्के या तीन राज्यांतील तर केवळ महाराष्ट्रातील 35 टक्के आहेत. 

महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांतील सर्वाधिक बाधित जिल्ह्यांची यादीही आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. यात महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, कोल्हापूर, सांगली, नाशिक, अहमदनगर, रायगड, जळगाव, सोलापूर, सातारा आणि पालघर जिल्ह्यांचा समावेश आहे. आंध्र प्रदेशातील प्रकाशम, चित्तूर हे जिल्हे तर कर्नाटकातील कोप्पल, म्हैसूर, दावणगिरी आणि बळ्ळारी या जिल्ह्यांचा समावेश आहे.  

देशात कोरोनाच्या सामूहिक उद्रेकाला ऑगस्टपासूनच सुरवात झाली आहे. याचा वारंवार इन्कार करणाऱ्या केंद्र सरकारने यावर बोलणे टाळले आहे. रुग्णसंख्या वाढली असली तरी  मृत्यूदर घटून १.७३ झाल्याचे सरकारचे म्हणणे आहे. देशात या वर्षाअखेरपर्यंत किंवा पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कोरोना लस उपलब्ध होईल, असाही सरकारचा अंदाज आहे. 

देशातील १३० कोटी लोकसंख्येपैकी सुमारे फक्त ४ कोटी ७७ हजार नागरिकांच्या चाचण्या झालेल्या आहेत. कोविड-१९ महामारीचे अमेरिका व ब्राझीलपाठोपाठ सर्वाधिक ४० लाखांहून जास्त रूग्ण भारतात आहे. भारतात ही परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com