सुशीलकुमार मोदींच्या विरोधात श्याम रजक उतरणार मैदानात

बिहारमध्ये राज्यसभेच्या एका जागेसाठी निवडणूक होत आहे. या जागेवर भाजपने माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदींना उमेदवारी दिली आहे.
mahagathbandhan will field shyam rajak for rajya sabha seat in bihar
mahagathbandhan will field shyam rajak for rajya sabha seat in bihar

पाटणा : बिहारच्या मुख्यमंत्रिपदी पुन्हा नितीशकुमार हेच राहिले असले तरी भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात आले नव्हते. यामुळे अखेर भाजपने नाराज असलेल्या मोदींना राज्यसभा उमेदवारी देऊन त्यांचे पुर्नवसन केले आहे. मोदींच्या विरोधात महाआघाडीने श्याम रजक यांना मैदानात उतरवण्याची तयारी केली आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर राज्यसभेच्या निवडणुकीवरुन राज्यातील वातावरण तापले आहे. 

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू), भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस, डावे यांची महाआघाडी असे चित्र होते. एनडीने 125 जागा मिळवत स्पष्ट बहुमताचा आकडा गाठला. याचवेळी महाआघाडीने 110 जागा मिळवल्या होत्या. 

राज्यात राष्ट्रीय जनता दल 75 जागा मिळवून सर्वांत मोठा पक्ष ठरला होता. दुसऱ्या क्रमांकावर 74 जागांसह भाजप होता. जेडीयूला 43 जागा मिळाल्या असून, काँग्रेसला 19 जागा आहेत. चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे. नितीश यांच्या जेडीयूला कमी जागा मिळाल्याने ते पुन्हा मुख्यमंत्री होणार का अशी चर्चा सुरू झाली होती. अखेर भाजपने नितीशकुमार यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घातली. 

भाजपने उपमुख्यमंत्रिपदी तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांची निवड केली होती. सुशीलकुमार मोदी यांना उपमुख्यमंत्री देण्यात आले नव्हते. याबद्दल मोदी यांनी जाहीर नाराजीही व्यक्त केली होती. लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांच्या निधनानंतर बिहारमध्ये राज्यसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. याबाबतची अधिसूचना निवडणूक आयोगाने काढली आहे. 

या जागेवर भाजपने सुशीलकुमार मोदींना त्यांचा उमेदवारी दिली आहे. भाजपने एकाच वेळी मोदींचे पुनर्वसन आणि चिराग पासवान यांना झटका देण्याची चाल खेळली आहे. यामुळे पासवान यांना मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार, अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत 3 डिसेंबर  आहे. या जागेसाठी 14 डिसेंबरला मतदान असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाआघाडीकडून आरजेडीचे नेते श्याम रजक यांना मैदानात उतरवण्याची तयारी केली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी जेडीयूने कॅबिनेट मंत्री राहिलेल्या रजक यांनी सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी जेडीयू सोडून रजक हे आरजेडीमध्ये दाखल झाले होते. मात्र, त्यांना विधानसभेचे तिकिट देण्यात आले नव्हते. आता त्याची भरपाई करण्यासाठी त्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात येणार आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही महाआघाडीने उमेदवार देऊन सत्ताधारी एनडीएची डोकेदुखी वाढवली होती. आता राज्यसभेच्या जागेवर उमेदवार देऊन महाआघाडीने पुन्हा एकदा एनडीएला आव्हान दिले आहे. 

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com