महादेव जानकरांच्या 'रासप'चा गुजरातमध्ये झेंडा; स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ऐतिहासिक यश

गुजरातमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाला ऐतिहासिक यश मिळाले आहे.
mahadev jankar rashtriya samaj party registers win in gujarat local body polls
mahadev jankar rashtriya samaj party registers win in gujarat local body polls

मुंबई : गुजरातमध्ये नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाला ऐतिहासिक विजय मिळाल्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिली. गुजरात येथील पादरा वडोदरा नगरपालिका निवडणुकीत एकूण २८ जागांपैकी ७ जागा जिंकत या नगरपालिकेचे विरोधी पक्षनेतेपद मिळवले आहे. आता राष्ट्रीय समाज पक्षाने महाराष्ट्राबाहेरही विस्तार केला आहे. 

गुजरातमधील 81 नगरपालिका, 31 जिल्हा परिषदा आणि 231 पंचायत समित्यांची निवडणूक नुकतीच झाली. महापालिका निवडणुकांमध्ये वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर भाजपने गुजरातमधील जिल्हा परिषद, नगरपालिका आणि पंचायत समित्यांमध्ये काँग्रेसला धोबीपछाड केले आहे. राज्यात भाजपने ग्रामीण भागातही आपला वरचष्मा असल्याचे पुन्हा दाखवून दिले आहे. भाजपने  सर्वच्या सर्व 31 जिल्हा परिषदा, 231 पैकी 196 पंचायत समित्या आणि 81 पैकी 74 नगरपालिकांमध्ये विजय मिळवला आहे. काँग्रेसने केवळ एक नगरपालिका आणि 18 तालुका पंचायती जिंकल्या आहेत. 

पादरा वडोदरा नगरपालिकेत 28 पैकी 21 जागांवर यश मिळवत भारतीय जनता पक्षाने सत्ता ताब्यात ठेवण्यात यश मिळवले आहे. या नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. गुजरातमध्ये मिळालेल्या ऐतिहासिक यशाबद्दल रासपच्या गुजरात टीमचे जानकर यांनी अभिनंदन केले आहे. तसेच, गुजराती मतदारांनी राष्ट्रीय समाज पक्षावर विश्वास दाखवल्याबद्दल जानकर यांनी गुजराती मतदारांचेही आभार मानले आहेत. 

गुजरातमधील सहा महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल काही दिवसांपूर्वीच जाहीर झाले आहेत. सहाही महापालिकांमध्ये भाजपचे कमळ फुलले आहे. या निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ झाला, तर 'आप'ने सुरत महापालिकेत जोरदार एंट्री केली. या निवडणुकांनंतर स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीतही भाजपला मोठे यश मिळाले. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com