भाजप नेत्याच्या पॉझिटिव्ह मुलाला हेल्पलाईनवरुन कॉल अन् तिकडेच मरण्याचा सल्ला

देशात कोरोनाचा उद्रेक झाला असून, दररोज दोन लाखांहून अधिक रुग्ण सापडू लागले आहेत. आता सरकारी अनास्थेचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे.
lucknow covid command center caller says covid patients to die there
lucknow covid command center caller says covid patients to die there

लखनौ : देशात कोरोनाचा उद्रेक झाला असून, दररोज दोन लाखांहून अधिक रुग्ण सापडू लागले आहेत. उत्तर प्रदेशात आता कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. आता भाजप नेत्याच्या मुलाला कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर सरकारी कोरोना हेल्पलाईनवरुन धक्कादायक उत्तर देण्यात आल्याची बाब उघड झाली आहे. याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. 

उत्तर प्रदेश सरकार कोरोना रुग्ण आणि मृतांचे आकडे कमी दाखवत असल्याची ओरड सुरूआहे.  यातच सरकारी अनास्थेचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. लखनौ भाजपच्या माजी शहराध्यक्षांच्या मुलाबाबत हा प्रकार घडला आहे. त्यांचे नाव संतोषकुमारसिंह आहे. संतोष आणि त्यांचे सगळे कुटुंबीय 12 एप्रिलला कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हे कुटुंब घरीच विलगीकरणात आहे. 

संतोष यांना 15 एप्रिलला सरकारी कोरोना हेल्पलाईनवरुन कॉल आला. या शूची नाव असलेल्या कॉलरने त्यांना गृह विलगीकरणाचे अॅप डाऊनलोड केले आहे का, अशी विचारणा केली. यावर संतोष यांनी नकार दिला आणि आतापर्यंत आम्हाला कुणीही नेमके काय करायचे याविषयी माहिती दिली नसल्याचे सांगितले. यावर संबंधित कॉलरने संतापून तुम्ही तिथेच मरा, असे बोलून कॉल बंद केला. 

संतोष यांनी हे संपूर्ण संभाषण रेकॉर्ड केले आहे. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. संतोष यांनी या सर्व प्रकाराची तक्रार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाकडे केली आहे. तसेच, ऑडिओ क्लिपही मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवली आहे. अद्याप मुख्यमंत्री कार्यालयाने यावर कोणताही कार्यवाही केलेली नाही. 

याबाबत बोलताना संतोष म्हणाले की, ज्याचे संपूर्ण कुटुंब गृह विलगीकरणात आहे अशा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाशी तुम्ही अशा प्रकारे बोलता का? कोविड कमांड सेंटर हे डॉक्टर आणि कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमधील महत्वाचा दुवा आहे. अशा प्रकारचे कॉलर सरकारच्या रुग्णांना घरीच उपचार देण्याच्या प्रयत्नांवर पाणी फेरत आहेत.  

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com