गॅस सिलिंडर दरवाढीने 8 महिन्यांत सर्वसामान्यांचा कापला खिसा...

देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. अशातच आता स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे.
lpg cylinder price hiked by 190 rupees in 8 months
lpg cylinder price hiked by 190 rupees in 8 months

नवी दिल्ली : देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Petrol) दरवाढीमुळे नागरिक संकटात सापडले आहेत. आधीच कोरोना महामारीमुळे हैराण झालेल्या नागरिकांचे या दरवाढीमुळे हाल होत आहेत. अशातच आता स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या (LPG Cylinder) दरात वाढ झाली आहे. चालू वर्षात एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल 190 रुपयांची वाढ झाली आहे. 

विनाअंशदानित गॅस सिलिंडरसाठी 25 रुपये जादा द्यावे लागतील. दिल्ली आणि मुंबईत विनाअंशदानित गॅस सिलिंडरची किंमत आता 884.50 रुपयांवर गेली आहे. देशातील महानगरांमध्ये एलपीजी सिलिंडरची सर्वांत जास्त किंमत कोलकत्यात आहे. कोलकत्यात एलपीजी सिलिंडर 911 रुपयांना आहे. त्याखालोखाल चेन्नईत एलपीजी सिलिंडरची किंमत आता 900.5 रूपये आहे. या दरवाढीमुळे आधीच महागाईने होरपळत असलेल्या जनतेला आणखी चटके बसू लागले आहेत. सलग तीन महिने सिलिंडरच्या दरात सुमारे 25 रुपये वाढ करण्यात आली आहे. 

देशात पेट्रोलआणि डिझेलच्यादरवाढीचा भडका उडाला आहे. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. पेट्रोलच्या दरासोबत डिझेलनेही शंभरचा टप्पा ओलांडण्यास सुरवात केली आहे.यातच आता एलपीजी सिलिंडर दरवाढीची भर पडली आहे. चालू वर्षातील आठ महिन्यांत एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल 190 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून मागील सात वर्षांत सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावून सरकारने आपली झोळी भरुन घेतली आहे. भाजप सरकारच्या काळात पेट्रोलवरील करात 220 टक्के आणि डिझेलवरील करात 600 टक्के वाढ झाली आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मे 2014 मध्ये भाजपचे सरकार आले. त्यावेळी केंद्र सरकारचा पेट्रोलवरील प्रतिलिटर कर 10.38 रुपये होता आणि आता तो 32.90 रुपये आहे. मे 2014 मध्ये केंद्र सरकारचा डिझेलवरील प्रतिलिटर कर 4.52 रुपये होता. तो आता 31.80 रुपये आहे. म्हणजे मागील सात वर्षांत पेट्रोलवरील करात 220 टक्के आणि डिझेलवरील करात 600 टक्के वाढ झाली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com