अबब...महिला सरपंचाकडे सापडली तब्बल 19 कोटी रुपयांची बेहिशेबी संपत्ती

महिला सरपंचावर लोकायुक्त पोलिसांनी मारलेल्या छाप्याची राज्यभरात जोरदार चर्चा सुरू आहे.
अबब...महिला सरपंचाकडे सापडली तब्बल 19 कोटी रुपयांची बेहिशेबी संपत्ती
lokayukta police uncovered woman sarpanch 19 crore property

रेवा : महिला सरपंचावर (Womam Sarpanch) लोकायुक्त पोलिसांनी (Lokayukta Police) मारलेल्या छाप्याची राज्यभरात जोरदार चर्चा सुरू आहे. या सरपंचाकडील तब्बल 19 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता ( आतापर्यंत उघडकीस आली आहे. यात दोन आलिशान बंगले, 30 गाड्या आणि बांधकाम यंत्रे यांचा समावेश आहे. तिच्याकडून अजून बेहिशेबी मालमत्ता उघडकीस येऊ शकते, असा लोकायुक्त पोलिसांचा अंदाज आहे. 

याविषयी माहिती देताना पोलीस अधीक्षक राजेंद्र वर्मा म्हणाले की, मध्य प्रदेशातील रेवा जिल्ह्यातील ही घटना आहे. रेवा जिल्ह्यातील बैजनाथ गावची सरपंच सुधा सिंह (Sudha Singh) हिच्या घरावर लोकायुक्त पोलिसांनी नुकताच छापा मारला. यानंतर तिच्याकडील 19 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आली आहे. या सुधा सिंह हिच्या विरोधात भ्रष्टाचाराची तक्रार देण्यात आली होती. 

लोकायुक्त पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी सुधा सिंहच्या घरावर छापा मारला होता. तिच्या घरातून मालमत्तेसंबंधी कागदपत्रे जमा करण्याचे काम आजही सुरू होते. तिचे दोन आलिशान बंगले समोर आले आहेत. यातील एका बंगल्यात जलतरण तलाव असून, त्याची किंमत 2 कोटी रुपये आहे. दुसऱ्या बंगल्याची किंमत 1.5 कोटी रुपये आहे. याचबरोबर 20 लाखांचे सोन्याचे दागिने, साडेतीन लाख रुपयांची रोकड, 12,53 लाख रुपयांच्या बँक ठेवी आणि विमा पॉलिसी यांचाही बेहिशेबी संपत्तीत समावेश आहे. 

सुधा सिंह हिच्याकडून 8 कोटी रुपये किमतीच्या 75 भूखंडांची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. तिचे दोन स्टोन क्रशर, एक मिक्स्चर मशिन, एक वीट मशिन आणि इतर 30 गाड्या यासह बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या मशिनरी जप्त करण्यात आली आहे. तिची एकूण बेहिशेबी मालमत्ता 91 कोटी रुपये असून, पुढील तपास सुरू आहे, असे लोकायुक्त पोलिसांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.