चिराग पासवान म्हणतात, मी तर मोदींचा हनुमान...छाती फाड़ूनही तुम्हाला दाखवू शकतो!

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी बिहारमध्ये सुरू झाली आहे. राजकीय पक्षांच्या प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत.
ljp president chirag paswan said i am hanhuman of prime minister modi
ljp president chirag paswan said i am hanhuman of prime minister modi

नवी दिल्ली : केंद्रीय रामविलास पासवान यांचा लोक जनशक्ती पक्षाने (एलजेपी) मुख्यमंत्री नितीशकुमार यांना विरोध करीत बिहारमधील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून  (एनडीए) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. याचवेळी देश पातळीवर भाजपला पाठिंबा कायम राहील, अशी भूमिका एलजेपीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी घेतली आहे. यामुळे ही भाजपचीच खेळी असल्याचीच चर्चा सुरू झाली आहे. यातच चिराग यांनी आज 'हनुमान' भक्ती जाहीर करुन आधीच कोंडीत सापडलेल्या भाजपच्या अडचणी आणखी वाढवल्या आहेत. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता अनेक भाजप नेते एलजेपीमध्ये प्रवेशासाठी गर्दी करु लागले आहेत. यातील बहुतांश नेत्यांचे मतदारसंघ हे जागावाटपात एनडीएकडे गेले आहेत. भाजप नेते पक्षांतर करीत असताना भाजप नेतृत्व याकडे काहीच घडत नसल्याप्रमाणे पाहत आहे. तसेच, यावर काही प्रतिक्रियाही देताना दिसत नाही. नितीशकुमार हेच मुख्यमंत्री असतील, असे भाजप म्हणत आहे. याचवेळी भाजपकडून जेडीयूच्या विरोधात राजकारण सुरू आहे. 

चिराग पासवान हे स्वतंत्रपणे लढणार असून, ते जेडीयूच्या विरोधात उमेदवार उभे करणार आहेत. यामुळे ते प्रामुख्याने जेडीयूची मते खातील. मात्र, ते भाजपला पाठिंबा देणार आहेत. यामुळे भाजपला फायदाच होणार आहे. याचवेळी जेडीयूकडे जागावाटपात गेलेल्या मतदारसंघांतील नेते एलजेपीमध्ये जात आहेत. यामुळे या सगळ्या घटनाक्रमाकडे संशयाने पाहिले जात आहे. नितीश यांच्या जागा कमी करण्यासाठीच भाजपने चिराग पासवान यांना स्वबळाची चूल मांडण्यास सांगितले, अशीही चर्चा सुरू आहे. 

आता चिराग यांनी 'हनुमानभक्ती'चा दाखला दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, मला निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो वापरण्याची गरज नाही. ते माझ्या हृदयात आहेत आणि मी त्यांच्या हनुमान आहे. गरज पडल्यास माझी छाती फाडून हे दाखवू शकतो. 

चिराग पासवान यांना भाजपचीच फूस असल्याची उघड चर्चा सुरू झाली आहे. यामुळे सत्ताधारी एनडीएमध्ये कुरबुरी सुरू झाल्या आहेत. आता चिराग पासवान यांच्या विरोधात भाजपला कठोर भूमिका घ्यावी लागली आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी आतापर्यंत चिराग पासवान यांच्याविरोधात थेट बोलणे टाळले होते. चिराग यांच्या या विधानाने भाजप नेत्यांची आणखीनच कोंडी झाली आहे. चिराग यांना काय उत्तर देणार हाच मोठा प्रश्न भाजप नेत्यांना पडला आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com