मंत्री असलेल्या पतीसाठी महिला आमदाराने केला पक्षाचा त्याग!

मंत्री असलेल्या पतीसाठी महिला आमदाराने पक्षाचा त्याग करुन पतीसोबत एकत्रितपणे समाजसेवा करण्याचा निर्णय घेतला आहे.
ljp mla nutan singh joins bjp in presence of state bjp president sanjay jaiswal
ljp mla nutan singh joins bjp in presence of state bjp president sanjay jaiswal

पाटणा : भाजपची 'बी टीम' अशी टीका होणाऱ्या चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाला (एलजेपी) आता मोठा धक्का बसला आहे. एलजेपीच्या महिला आमदारालाच भाजपने फोडले आहे. या आमदाराचे नाव नूतनसिंह असे असून, त्यांचे पती हे भाजपमध्ये असून, मंत्री आहेत. पतीसाठी पक्ष सोडल्याचा दावा त्यांनी केला आहे. नूतनसिंह यांचे पती हे नीरजकुमारसिंह हे अभिनेता सुशांतसिंह राजपूतचे चुलतभाऊ आहेत. 

बिहारच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीपासून (एनडीए) फारकत घेऊन भाजपशी जवळीक कायम ठेवणे चिराग पासवान यांना महागात पडले आहे. बिहारमध्ये भाजप आणि संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) सरकार सत्तेवर असून, नितीशकुमार हे मुख्यमंत्रिपदी आहेत. विधानसभा निवडणुकीत एलजेपीमुळे जेडीयूचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी नितीशकुमार आक्रमक झाले आहेत. एलजेपीतील अनेक नेते जेडीयूमध्ये डेरेदाखल झाले आहेत. 

आता भाजपनेही चिराग पासवान यांना मोठा धक्का दिला आहे. एलजेपीच्या विधान परिषदेच्या आमदार नूतनसिंह यांनी भाजपमध्ये आज प्रवेश केला. या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल, नूतनसिंह यांचे पती व मंत्री नीरजकुमारसिंह हे उपस्थित होते. याप्रसंगी नूतनसिंह म्हणाल्या की, माझे पती भाजपमध्ये आहेत. त्यामुळे मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता आम्ही दोघे मिळून एकत्रितपणे समाजसेवा करू. 

चिराग पासवान यांच्यामुळे जेडीयूला विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसला होता. एलजेपीने राज्यभरात भाजपच्या विरोधात उमेदवार दिले नव्हते मात्र, जेडीयूच्या विरोधात उमेदवार दिले होते. अनेक भाजप नेत्यांनी पक्ष सोडून लोक जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून जेडीयू उमेदवारांच्या निवडणूक लढवली होती. याचबरोबर चिराग पासवान यांनी सातत्याने नितीशकुमार यांना लक्ष्य केले होते. याचाच वचपा काढत नितीश कुमार यांनी पासवान यांच्या पक्षाचे १८ जिल्हाध्यक्ष आणि पाच प्रदेश महासचिवांसह २०८ नेत्यांना नुकतेच फोडले होते.

दरम्यान, बिहारमधील बहुजन समाज पक्षाचे एकमेव आमदार जामा खान यांनी काही दिवसांपूर्वीच जेडीयूमध्ये प्रवेश केला आहे. याचबरोबर अपक्ष आमदार सुमंतसिंह आणि लोक जनशक्ती पक्षाचे आमदार राजकुमारसिंह यांनीही जेडीयुमध्ये प्रवेश केला आहे. यापुढेही पासवान यांच्या पक्षातील आणखी नेते जेडीयूमध्ये येतील, असा दावा केला जात आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com