आयर्लंडचे लिओ वराडकर- 'मालवणी माणूस' पंतप्रधान पदाच्या शर्यतीत

लिओ यांचे कुटुंब मुळचे वराड (ता. मालवण) या छोट्याशा गावातील. त्यांचे वडील पेशाने डॉक्टर आहेत. ते मुंबईतून 1960 मध्ये आयर्लंडमध्ये स्थायिक झाले. त्यांनी तेथेच नर्सिंग क्षेत्रामध्ये काम करणार्‍या मुळ आयरीश असलेल्या मिरीअम यांच्याशी विवाह केला. लिओ यांना दोन मोठ्या बहिणी आहेत. विशेष म्हणजे या कुटुंबाची आपल्या गावाशी असलेली नाळ अजूनही कायम आहे.
आयर्लंडचे लिओ वराडकर- 'मालवणी माणूस' पंतप्रधान पदाच्या शर्यतीत

मालवण- मालवणी रक्त सातासमुद्रापार गेले तरी आपल्या कर्तृत्वाचे झेंडे रोवण्यात कमी पडत नाही, हे आतापर्यंत अनेकदा सिद्ध झाले आहे. असेच मूळ मालवणी असलेले लिओ अशोक वराडकर सध्या आयर्लंडच्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आहेत. जूनमध्ये होणार्‍या या निवडणुकीतील ते प्रमुख दावेदार मानले जात आहेत.

38 वर्षीय लिओ यांचा राजकारणातील प्रवास खूप वेगवान आहे. ते पेशाने डॉक्टर आहेत. डबलीग हे त्यांच्या कर्तृत्वाचे मुख्य ठिकाण. सुरवातीला उपमहापौर, त्यानंतर आयर्लंडच्या मंत्रीमंडळात स्थान मिळवत तेथे वाहतूक, पर्यटन आणि क्रिडा हे मंत्रीपद तसेच आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा मंत्रीपदावर त्यांनी प्रभावीपणे काम केले. यामुळेच थेट पंतप्रधान पदाचे मुख्य दावेदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.

एन्डा केनी यांनी पंतप्रधानपद सोडल्यानंतर लागलेल्या निवडणुकीत लिओ यांचा मुख्य मुकाबला सीमोन कोवनी यांच्याशी आहे. लिओ यांना मिळणारे समर्थन पाहता ते पंतप्रधान झाल्यास आश्‍चर्य वाटू नये अशी राजकीय स्थिती आहे. लिओ यांचे कुटुंब मुळचे वराड (ता. मालवण) या छोट्याशा गावातील. त्यांचे वडील पेशाने डॉक्टर आहेत. ते मुंबईतून 1960 मध्ये  आयर्लंडमध्ये स्थायिक झाले. त्यांनी तेथेच नर्सिंग क्षेत्रामध्ये काम करणार्‍या मुळ आयरीश असलेल्या मिरीअम यांच्याशी विवाह केला. लिओ यांना दोन मोठ्या बहिणी आहेत. विशेष म्हणजे या कुटुंबाची आपल्या गावाशी असलेली नाळ अजूनही कायम आहे. लिओ यांचे आई-वडील दोन वर्षापूर्वी एका धार्मिक कार्यक्रमासाठी वराड येथील आपल्या गावी आले होते.


समलिंगी विवाहाचे पुरस्कर्ते असल्याने चर्चेत

लिओ हे समलिंगी विवाहाचे पुरस्कर्ते मानले जातात. 2015 मध्ये आपल्या 36 व्या वाढदिवसादिवशी एका मुलाखतीत त्यांनी आपली ही भूमिका स्पष्ट केली होती. समलिंगी विवाह, गर्भपात कायद्यात, गर्भपात कायद्यात काही प्रमाणात शिथीलता अशा धोरणांचा त्यांनी पुरस्कार केला. यासाठी त्यांनी मोहिमही राबविली. आयर्लंड हा सामाजिकदृष्ट्या रुढीवादी देश मानला जातो. अशा ठिकाणी असे विचार घेवून पंतप्रधान पदाच्या शर्यतीत त्यांनी मारलेली मुसंडी आश्‍चर्यकारक मानली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com