काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल; पहिला झटका अधीररंजन चौधरींना! - leader of opposition in lok sabha adhir ranjan chowdhury will be replaced | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल; पहिला झटका अधीररंजन चौधरींना!

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 जुलै 2021

काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा बदलाचे वारे सुरू झाले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीररंजन चौधरी यांना पदावरुन हटवण्यात येणार आहे. 

नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये (Congress) बदलाचे जोरदार वारे सुरू झाले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते (LOP) अधीररंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) यांना पदावरुन हटवण्यात येणार आहे. पक्षाच्या 23 ज्येष्ठ नेत्यांनी अध्यक्षा सोनिया गांधी यांना मागील वर्षी पत्र लिहिले होते. यातील काही जण आता या पदासाठी शर्यतीत आहेत. 

संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलैपासून सुरू होत आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीररंजन चौधरी यांनी पदावरुन हटवले जाणार आहे. चौधरी यांना पदावरुन हटवावे यासाठी अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. पक्षाने आता एक व्यक्ती एक पद असा नियम अनुसरण्यास सुरवात केली आहे. चौधरी यांच्याकडे बंगालचे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद आहे. त्यामुळे त्यांना एका पदाच्या जबाबदारीतून मुक्त केले जाईल. त्यांना लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

लोकसभेतील पक्षाचे नेते अधीर रंजन चौधरी यांना बदलण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. सोनिया गांधी यांना पक्षातील धोरणांबाबत अत्यंत कठोर शब्दांत पत्र लिहिणाऱ्या नेत्यांमध्ये समावेश असलेले काही नेते या पदासाठी इच्छुक आहेत. अधीररंजन हे पश्चिम बंगालमधील खासदार आहेत. तसेच ते बंगाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही आहेत. बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला एकही जागा मिळाली नाही. पक्षावर पहिल्यांदाच ही नामुष्की ओढावली असल्याने पक्षनेतृत्व त्यांच्यावर नाराज असल्याचे समजते. येत्या 19 जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. हे अधिवेशन 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. त्यामुळं अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच नवीन पक्षनेत्याची घोषणा केली जाण्याची दाट शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

हेही वाचा : चंपत राय यांच्यावर संघ नेतृत्व नाराज पण पदावरुन हटवणार नाही 

दरम्यान, काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा तिढा अद्याप कायम आहे. तब्बल दोन वर्षांहून अधिक काळ काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष मिळत नसल्याचे चित्र आहे. पक्षाचे नेते राहुल गांधी हे अध्यक्षपद स्वीकारण्यास तयार नसल्याने काँग्रेसने आता नवीन पर्याय समोर आणला आहे. पक्षातील नेतृत्वाची पोकळी दूर करण्यासाठी एकापेक्षा जास्त उपाध्यक्ष नेमण्यासह संघटनात्मक पातळीवर फेररचना करण्यात येणार आहे.  

पक्षाच्या नेत्यांकडून वारंवार मागणी होत असली तरी राहुल गांधी हे अध्यक्षपद स्वीकारण्यास तयार नाहीत. यामुळे पक्षात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी पक्षाचे एकापेक्षा जास्त उपाध्यक्ष नेमावेत, असा प्रस्ताव समोर आला आहे. याआधीही वर्षभरापूर्वी प्रस्ताव समोर आला होता. आता नेतृत्वाने यावर गांभीर्याने विचार करण्यास सुरवात केली आहे. पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, अखिल भारतीय काँग्रेस समितीची फेररचना करण्यात येणार आहे. पक्षाला एकापेक्षा जास्त उपाध्यक्ष नेमण्यात येतील. हे उपाध्यक्ष देशातील विभागांनुसार असतील. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख