फडणवीसांनी मोठी ऑफर देऊनही मी पक्ष सोडला! बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

फडणवीसांनी माझ्या पुनर्वसनासाठी दिलेला प्रस्तावही मी नाकारला, असे बड्या नेत्याने म्हटले आहे.
Devendra Fadnavis and Manohar Parsekar
Devendra Fadnavis and Manohar Parsekar Sarkarnama

पणजी : देवेंद्र फडणवीसांनी मला मोठी ऑफर देऊ केली होती. मात्र, मी त्यांना थेटपणे नकार कळवून पक्ष सोडला, असा बॉम्ब भाजपच्या बड्या नेत्याने फडणवीसांनी माझ्या पुनर्वसनासाठी दिलेला प्रस्तावही मी नाकारला, असेही त्यांनी म्हटले आहे. हे बडे नेते आहेत गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर (Laxmikant Parsekar). निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे.

गोव्यात (Goa) विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) तोंडावर भाजपला(BJP) गळती लागली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गोव्याच्या प्रभारीपदाची धुरा आहे. पक्षाला लागलेली गळती आणि दिवसेंदिवस वाढतच असलेली बंडखोरी रोखण्याचे आव्हान फडणवीसांसमोर आहे. यातच माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांनी थेट राजीनामा देऊन भाजपला निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का दिला आहे. पार्सेकर यांनी पक्ष सोडण्याआधी फडणवीसांनी त्यांची भेट घेतली होती. याबद्दल पार्सेकर यांनी म्हटले आहे की, फडणवीसांनी माझी भेट घेतली आणि माझे मन वळवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मला मोठी ऑफरही दिली होती. पक्षाकडून माझे पुनर्वसन होईल, असा शब्दही त्यांनी दिला होता. मात्र, मला पुनर्वसनात रस नसल्याचे मी थेटपणे सांगितले. मला कोणतेही मोठे पद नको. मला मतदारसंघातील अपूर्ण विकासकामे पूर्ण करायची आहेत. मी मुख्यमंत्री असताना ही कामे मी सुरू केली होती.

मी फडणवीसांना आधी सांगितले आणि नंतर पक्ष सोडला. मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांना सांगितले होते. यावर ते आश्चर्यचकित झाले होते. पक्षाने माझे मन वळवावे यासाठी या हेतून मी कोणतीही गोष्ट छुपी ठेवलेली नव्हती. पक्षाच्या सर्वेक्षणात जनतेचा मला फारसा पाठिंबा नसल्याचे पक्षाने म्हटले आहे. आता पक्षाचे सर्वेक्षण खरे की जनमताचा कौल हे मी दाखवून देणार आहे. यासाठी फार वेळ बघण्याची गरज नाही, असेही पार्सेकरांनी सांगितले.

Devendra Fadnavis and Manohar Parsekar
एलपीजी सिलिंडर 500 रुपयांच्या आतच मिळणार! मुख्यमंत्र्यांनी दिला शब्द

राज्यसभा अन् राज्यपालपद धुडकावलं

गोव्यातील भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याआधी पार्सेकर यांना दिल्लीत बोलावून घेण्यात आले होते. पक्षाचे अध्यक्ष नड्डा, अमित शहा आणि सरचिटणीस बी.एल.संतोष यांनी पार्सेकरांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी पार्सेकरांशी चर्चा केली होती. या चर्चेत पार्सेकरांना राज्यसभा अथवा राज्यपालपद असे दोन पर्याय देण्यात आले होते. परंतु, पार्सेकर हे विधानसभेवर ठाम होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Devendra Fadnavis and Manohar Parsekar
अन्वय नाईक आत्महत्या अन् पोलिसांच्या बदल्यांवरून देशमुखांची झाडाझडती

पार्सेकर हे भाजपच्या जाहीरनामा समितीचे प्रमुख होते. ते भाजपच्या कोअर कमिटीचेही सदस्य होते. भाजपचे ज्येष्ठ नेते मानले जाणारे पार्सेकर हे गोव्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. मनोहर पर्रीकर हे केंद्रात संरक्षणमंत्री म्हणून गेल्यानंतर पार्सेकर हे 2014 ते 2017 या काळात मुख्यमंत्री होते. ते पर्रीकरांचे विश्वासू व निकटवर्तीय मानले जात. पार्सेकरांना भाजपने तिकिट नाकारले होते. पार्सेकर यांच्या जागी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले विद्यमान आमदार दयानंद सोपटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com