मोठा दिलासा : देशात दीड महिन्यात पहिल्यांदाच असं घडलं!

देशातील कोरोना रुग्णसंख्येतील वाढ सुरूच असली तरी या वाढीचा वेग आता कमी होऊ लागला आहे.
in last 44 days india first time reported below 2 lakh daily covid cases
in last 44 days india first time reported below 2 lakh daily covid cases

नवी दिल्ली : देशातील (India) कोरोना (Covid19)  रुग्णसंख्येतील (Patients) वाढ सुरूच असली तरी या वाढीचा वेग आता कमी होऊ लागला आहे. देशात 44 दिवसांत प्रथमच नवीन रुग्णसंख्या 2 लाखांच्या खाली आली आहे. देशात सलग 15 दिवस नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक नोंदवण्यात आली आहे. ही अतिशय दिलाशाची बाब असल्याचे आरोग्य तज्ञांचे मत आहे. 

देशात आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 1 लाख  86  हजार 364 नवीन रुग्ण सापडले असून, 3 हजार 660 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 2 कोटी 75 लाख 55 हजार 457 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 3 लाख 18 हजार 895 झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. रुग्णसंख्या कमी होत असून 44 दिवसांत पहिल्यांदाच रोजची रुग्णसंख्या 2 लाखांच्या खाली आली आहे.  देशातील रुग्णसंख्या याआधी 25 मे रोजी 2 लाखांच्या खाली आली होती. असे असले तरी मृत्यूचा आकडा वाढत असून, याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. 

देशातील सक्रिय रुग्णांची संख्या कमी होऊ लागली असून, आता ती 23 लाखांवर आली आहे. सक्रिय रुग्णांची जास्त असल्याने देशातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढला होता. रुग्णांसाठी रुग्णालये अपुरी पडू लागल्याचे चित्र होता. ही संख्या कमी होऊ लागल्याने हळूहळू आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी होऊ लागला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 23 लाख 43 हजार 152 असून, एकूण बाधितांमध्ये याचे प्रमाण 8.50 टक्के आहे. देशात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 90.34 टक्के आहे. देशात बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 2 कोटी 48 लाख 93 हजार 410 आहे. याचवेळी मृत्यूदर वाढून 1.16 टक्के झाला आहे. 

देशातील कोरोना रुग्णसंख्या वाढीचे टप्पे 
20 लाख : 7 ऑगस्ट  (2020) 
30 लाख : 23 ऑगस्ट  
40 लाख : 5 सप्टेंबर  
50 लाख : 16 सप्टेंबर 
60 लाख : 28 सप्टेंबर 
70 लाख : 11 ऑक्टोबर  
80 लाख : 29 ऑक्टोबर  
90 लाख : 20 नोव्हेंबर 
1 कोटी : 19 डिसेंबर 
1.5 कोटी : 19 एप्रिल (2021)  
2 कोटी : 4 मे 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com