मी अडवाणींना अटक करून संदेश दिला होता की...! लालूंच सुचक वक्तव्य

लालकृष्ण अडवाणी यांनी 1990 मध्ये राम मंदिरासाठी रथ यात्रा काढली होती.
Lal krishna Advani, lalu Prasad Yadav
Lal krishna Advani, lalu Prasad YadavSarkarnama

नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) यांनी 1990 मध्ये राम मंदिरासाठी (Ram Mandir) रथ यात्रा काढली होती. हा यात्रा बिहारमध्ये दाखल झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या आदेशावरून अडवणी यांच्यासह काही नेत्यांना अटक करण्यात आली होती. ही आठवण काढत यादव यांनी सोमवारी भाजपला (BJP) सुचक इशारा दिल्याचे मानले जात आहे.

लालूप्रसाद यादव मुख्यमंत्री असताना बाबरी मशिदीच्या (Babri Masjid) जागेवर राममंदीर उभारण्याचा मुद्दा चांगलाच तापला होता. ता. 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशिद पाडण्यात आली. याचे निमित्त साधत लालूंनी सोमवारी एक ट्विट करत ते मुख्यमंत्री असताना जनतेला केलेल्या आवाहनाचे वृत्तपत्रात छापून आलेले कात्रण जोडले आहे. तसेच त्यांनी अडवाणींना अटक केल्याची आठवणही सांगितली आहे.

Lal krishna Advani, lalu Prasad Yadav
मलिकांना बोलणं भोवणार? वानखेडे यांनी पुन्हा उच्च न्यायालयात घेतली धाव

लालू यांनी म्हटलं आहे की, राम जन्मभूमी-बाबरी मशीद मुद्दाने देशाला एका नाजूक स्थितीत आणले होते. मी अडवाणी यांना अटक करून संपूर्ण जगाला संदेश दिला होता की, आजही भारतात शांतीप्रिय व धर्मनिरपेक्ष ताकद मजबूत आहे. फॅसिस्टवादी शक्तींना उखडून टाकण्याची ताकद आमच्यामध्ये आहे,' असं ट्विट लालूंनी केलं आहे. या ट्विटच्या माध्यमातून लालूंनी भाजपला सूचक इशारा दिल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, अडवाणी यांनी 25 सप्टेंबर 1990 रोजी गुजरातमधील सोमनाथ येथून रथ यात्रा सुरू केली होती. ही यात्रा बिहारमध्ये दाखल झाल्यानंतर अडवणींना 23 ऑक्टोबर रोजी समस्तीपुर येथे अटक करण्यात आली होती. विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांनाही त्यावेळी अटक झाली होती. 30 ऑक्टोबर रोजी ही यात्रा अयोध्येत नेण्याचे नियोजन होते.

यानंतर 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशिद पाडण्यात आली. या घटनेनंतर देशात अनेक ठिकाणी जंगली उसळल्या होत्या. याच दिवसाची आठवण काढत लालूंही हे ट्विट केलं आहे. अयोध्येच्या मुद्याला तुमच्या शेतीत, गावांत आणि गल्लीत येऊ देऊ नका. एकमेकांसोबत खांद्याला खांदा लावून उभे राहला. बिहारमध्ये जी सद्भावना आहे त्याला अधिक मजबूत करा, असं आवाहन नागरिकांना केल्याचे कात्रण लालूंनी ट्विटमध्ये जोडलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com